हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारला दिला आहे. गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, तर महाराष्ट्रात का लादतात, असा रोखठोक सवाल राज यांनी महायुती सरकारला विचारला. महाराष्ट्राचं हिंदीकरणं करण्याचं भाजपचा हा डाव आहे, असा घणाघात राज यांनी केला.
हिंदी हि काही राज्यांची भाषा आहे, ती राष्ट्रभाषा नाही, मग महाराष्ट्रात सक्ती का? आयएएस अधिकाऱ्यांना मराठी बोलायला लागू नये, म्हणून ही सक्ती करताहेत का? असा सवाल ठाकरे यांनी केला. या निर्णयामागे आयएएस लॉबीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. शाळामध्ये हिंदी कशी शिकवली, तेच पाहतो, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील शाळेंच्या मुख्याध्यपकांना राज ठाकरे यांनी पत्र पाठवले आहे. हे पत्र पाच दिवसांपूर्वी तयार होतं. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं होतं. त्यांनी निर्णय मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं अशी माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे, म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आपल्या काय देणंघेणं त्याच्याशी, असे राज ठाकरे यांनी सुनावलं आहे.
"शाळांनी सरकारला सहकार्य करु नये. यामध्ये मराठी भाषेसह, मुलांचंही नुकसान आहे. राजकारणाला तुम्ही बळू पडू नका. मुलं मोठी झाल्यावर गरजेनुसार हवी ती भाषा शिकू शकता. तुम्ही ठाम राहिलात तर आम्ही तुमच्या पाठीशी उभी राहू. पण जर विद्यार्थ्यांवर भाषा लादली तर मनसैनिक चर्चेसाठी येतील," असा इशाराचठाकरेंनी मुख्याध्यपकांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.