Gajanan Kale, sanjay raut sarkarnama
मुंबई

संजय राऊत अन् शिवसेनेनं तुमची धुणी-भांडी करायची का ? ; मनसेनं डिवचलं

खंजीर, कोथळा,वाघनखे,मर्द,मावळा सह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी "पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच (NCP) असेल,"असे विधान केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला (shivsena) डिवचलं आहे. मनसेचे (mns) प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी टि्वट करीत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंडेच्या विधानावरुन गजानन काळेंनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल तर मग संजय राऊत आणि शिवसेनेनं काय धुणी-भांडी करायची का मग तुमची?, अशा शब्दात काळे यांनी टोमणा लगावला. (Gajanan Kale news)

"हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि तो सहन केला जाणार नाही. खंजीर, कोथळा,वाघनखे,मर्द,मावळा सह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा. अर्थात दै.सामना नव्हे टोमणा," असे काळे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'याआधी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे,' असे विधान केलं होतं त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी "पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच (NCP) असेल," असे विधान केल्यानं पुन्हा एकदा यावर चर्चा सुरु झाली आहे.

धनंजय मुंडेच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धनंजय मुंडे सातारा येथील सभेत बोलत होते.ते साताऱ्यातील डिस्कळ येथे एका सभेत बोलत होते. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात दौऱ्यावर आहेत.

"पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच (NCP) असेल," असे विधान धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. धनंजय मुंडे सातारा येथील सभेत बोलत होते. सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी विधान केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी त्यांनी "पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री पदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल," असे मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या या विधानावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, "प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही तिने पक्ष एकत्र असलो तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT