Gajanan Kale sarkarnama
मुंबई

औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसीं डोकं टेकवतात, तेव्हा राष्ट्रवादी निषेध का नोंदवत नाही ?

"राष्ट्रवादीसाठी औरंगजेब सुफी-संत ? हा आहे राष्ट्रवादीचा खरा चेहरा,"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची रविवारी पुण्यात सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. औरंगाबादेमध्ये एमआयएमचा खासदार झाला, यांना भुशभुशीत जमीन त्यांना दिली कोणी, शरद पवारांना औरंगजेब जर सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार,अफझल खान शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता, असं म्हणाले, तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलता,' अशा टीका राज ठाकरेंनी केली. (mns news update)

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी या विषयावरुन राष्ट्रवादीवर आज टि्वट करुन निशाणा साधला आहे. "राष्ट्रवादीसाठी औरंगजेब सुफी-संत ? हा आहे राष्ट्रवादीचा खरा चेहरा," असे गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

"शिवरायांचे नाव तोंडी लावायला घ्यायचे, विचारधारा औरंग्याच्या अवलादींच्या उदात्तीकरणाची? ओवैसी औंरग्याच्या थडग्यावर डोकं टेकवतो त्यावेळी राष्ट्रवादीवाले साधा निषेध ही नोंदवत नाहीत? यांचा बंदोबस्त करण्याची वेळ शिवसप्रेमींवर आलीय," असं काळे यांनी आपल्या टि्वट मध्ये म्हटलं आहे.

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकतरी आंदोलन केल्याची केस आहे का? मराठीचा प्रश्न असो, हिंदुत्वाचा प्रश्न असो एक तरी केस आहे का?, परवा संभाजीनगरच्या नामांतरावरुन राज ठाकरेंनी तुम्ही सरदार पटेल की महात्मा गांधी आहे. मी बोलतोय ला काय लॉजिक आहे," असं राज ठाकरेंनी यांनी म्हटलंय.

"या सर्वांचं हिंदूत्व ढोंगी आहे.त्यांचं हिंदूत्व पोकळ आणि आमचं हिंदूत्व रिझल्ट देणार आहे. खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, हे काय वॉशिंग पावडर आहे का," असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT