CM Udhav Thackeray Latest News
CM Udhav Thackeray Latest News sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंनी आपली सासुरवाडी सांभाळली पाहिजे; मनसे आमदार पाटलांनी डिवचलं...

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर शिंदे गटाने गुरुवारी कायदेशीर हक्क दाखवीत शाखा ताब्यात घेतली. डोंबिवली शहर हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सासुरवाडी असून कल्याण डोंबिवली शहर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिले आहे. असे असतानाही येथे शिंदे गटाचे वर्चस्व कायम दिसून आले आहे.

शिंदे गटाने शाखा ताब्यात घेताच "मला वाटतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे, संभाळायला पाहिजे त्यांनी" असे म्हणत मनसे आमदार पाटील यांनी ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. (CM Udhav Thackeray Latest News)

शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात दुफळी निर्माण झाल्यानंतर शिवसेना आमचीच असा दावा शिंदे आणि ठाकरे गटांकडून करण्यात येत आहे. हे प्रकरण आद्यापही न्यायप्रविष्ट आणि प्रलंबित आहे. दरम्यान, शिवसेना शाखा ताब्यात घेण्यास शिंदे गटाने सुरवात केली आहे.

गुरुवारी डोंबिवली मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली. ऑगस्ट महिन्यात शिंदे गट शाखेवर ताबा घेण्यास आल्यानंतर ठाकरे गटाने त्यांना जोरदार विरोध केला होता. त्यानंतर शाखेचे दोन गटात विभाजन झाले होते. यानंतर मात्र शिंदे गट जसा शहरात आक्रमक दिसतो तसा ठाकरे गट डोंबिवली मध्ये फारसा आक्रमक दिसत नव्हता. त्यातच शिंदे गटाकडून आज शाखा ताब्यात घेतली. मात्र, यावेळी ठाकरे गट सर्मथक शांतपणे शाखेबाहेर पडल्याने हा विरोध मावळला का? अशी चर्चा सुरू होती.

यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रीतिक्रिया दिली आहे. आमदार पाटील म्हणाले, तो त्या दोन गटांचा विषय आहे. शाखा कोणाच्या ताब्यात असायला पाहिजे, नसायला पाहिजे तो त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. मला वाटतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे, त्यांनी ती संभाळायला पाहिजे.

एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वाने देखील लक्ष दिले पाहिजे. कार्यकर्ता म्हणून ही भावना मी मांडतोय. बाकी माझा तसा काहीही या गोष्टीशी संबंध नाही, जे चाललंय ते त्यांना लखलाभो, अशा शब्दात त्या्ंनी ठाकरेंना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT