MNS leader Raju Patil criticizes Eknath Shinde and contractors over alleged irregularities in Dativali Lake beautification project, Thane district. Sarkarnama
मुंबई

Raju Patil News: ठाण्याची 'रिक्षा’ भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात! मनसे माजी आमदारानं व्हिडिओ शेअर करीत एकनाथ शिंदेंचं लक्ष वेधलं!

MNS leader Raju Patil criticizes Eknath Shinde: तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु असताना नवीन बांधण्यात येणारी भिंत कोसळली. ठाण्यातील आकाचे हस्तक व अधिकारी यांच्या तोंडात कोंबलेल्या टक्केवारीमुळे याची चौकशी होणार नाही याची ठेकेदाराला खात्री असेलच...

Mangesh Mahale

Thane Politics: ठाणे जिल्ह्यातील दिव्यात दातीवली येथे तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना नवीन बांधण्यात येणारी भिंत कोसळली. यावरुन स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा बालेकिल्ला असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. राजू पाटील यांनी याबाबत व्हिडिओ शेअर करीत या कामाच्या ठेकेदारांवर गंभीर आरोप करीत शिंदेंवर निशाणा साधला आहे.

दिव्यात दातीवली येथे ५ कोटी रूपये खर्चून तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरु असताना नवीन बांधण्यात येणारी भिंत कोसळली. ठाण्यातील आकाचे हस्तक व अधिकारी यांच्या तोंडात कोंबलेल्या टक्केवारीमुळे याची चौकशी होणार नाही याची ठेकेदाराला खात्री असेलच, अशा शब्दात राजू पाटलांनी या कामात भष्ट्राचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अव्यवस्थेत होरपळलेल्या व भ्रष्टाचारात बरबटलेल्या दिवा विभागातील नागरिकांच्या हे सर्व अंगवळणी पडले आहे. एक उत्तम शहर निर्माण होऊ शकतो अशा भौगोलिक स्थानावर वसलेला दिवा विभाग राजकारण्यांच्या व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे दिवसेंदिवस बकाळ होत चालला आहे, अशी खंत राजू पाटलांनी सोशल मीडिया एक्स वर व्यक्त केली आहे.

दरम्यान डोंबिवलीमध्ये पश्चिमेत वाहतूक पोलिस रिक्षाचालकांचा वाद चिघळला आहे. वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभाराविरोधात रिक्षाचालकांनी रिक्षा बंदची हाक होती. रिक्षा चालकांनी डोंबिवली स्टेशन परिसरात आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पाठिंबा दिला. रिक्षाचालकांनी यावेळी तास दोन तास स्टेशन परिसरातील रिक्षा ही बंद केल्या.

डोंबिवली पश्चिममध्ये अनेक वेळा वाहतूक पोलिस कामावर हजर राहत नाहीत अनेक जण बेकादा विनापरवाना विना बॅच रिक्षा चालवतात मात्र वाहतूक पोलिस जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप देखील रिक्षा चालकांनी केला आहे.

शुक्रवारी सकाळी वाहतूक विभागाचे एसीपी आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र एसीपींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने रिक्षाचालक संतापले. वाहतूक पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली स्टेशन परिसरात रिक्षा बंद केल्या. स्टेशन परिसरातील रिक्षा अडवून थांबविण्यात आल्या. यामुळे काही काळ प्रवाशांचे हाल झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT