मुंबई : अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी अमली पदार्थ विरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal director Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. वानखेडे यांची चैाकशी मुंबई पोलिस करणार आहेत. वानखेडे-मलिक आरोप-प्रत्यारोपावरुन राजकारण पेटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वानखेडेंना समर्थन दिले आहे. आता या प्रकरणात मनसेनं उडी घेतल्याचे दिसते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (mns leaders Sandeep Deshpande) शनिवारी सकाळी टि्वट करीत समीर वानखेडेंना शुभेच्छा दिल्या असल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर रंगली आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भाजपाकडून एनसीबीच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे. अनेक लोकांनी देखील समीर वानखेडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. यातच आता मनसेने देखील समीर वानखेडे यांना पाठिंबा दर्शवत सूचक ट्विट केले आहे.
लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगाचा फोटो संदीप देशपांडेंनी टि्वट केला आहे. ‘वानखेडेला शुभेच्छा’ असे सूचक ट्विट देशपांडे यांनी केले आहे. यानंतर मनसेचा समीर वानखेडे यांना पाठिंबा आहे का, अशी चर्चा होत आहे.
`एनसीबी`चे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal director Sameer Wankhede) याचा पाय आणि खोलात गेला आहे. या प्रकरणाला नाटकीय वळण मिळाले. त्यांच्या विरोधात एका वकिलाने ठाणे पोलिसांत बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणे, मुस्लीम असताना दलितांचे हक्क मिळवणे यासंदर्भात तक्रार येथे केली आहे. अॅड जयेश वाणी यांनी ठाणे येथील एम. आर. ए. पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सातत्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर टीका केली जात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे. वानखेडे यांनी धर्मांतर केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर समीर वानखेडे यांच्यासह त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनीही नवाब मलिकांवर पलटवार केला आहे.
ड्रग्ज पार्टी प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीचे चाळीसगाव 'कनेक्शन'
जळगाव : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी (kiran gosavi) याला पुणे पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांच्याविरोधात फसवणुकीच्या तीन तक्रारी पोलिसांकडे दाखल आहे. मलेशिया येथे नोकरीचे आमिष दाखवून पुण्यातील चिन्मय देशमुख यांची गोसावीने फसवणूक केली होती. गोसावी (kiran gosavi) याचे चाळीसगाव कनेक्शन समोर आले आहे. तो पिलखोड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी फरार घोषित केल्यानंतर तो त्या काळात आपल्या गावी पिलखोड येथे येऊन गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.