MNS Politics| MLA Raju Patil|
MNS Politics| MLA Raju Patil| 
मुंबई

मनसेत फेरबदलाचे वारे; राजू पाटलांचे बंधू विनोद पाटील यांची राजकारणात एंट्री

सरकारनामा ब्युरो

डोंबिवली : राज्यातील सत्तांतरानंतर अनेक बदल समोर येत आहेत. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेनंतर आज पुन्हा मनसेतून मोठी बातमी समोर आली आहे. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मनसेच्या पदाधिकारांच्या निवडीत फेरबदल करण्यात आला असून नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे.

येणाऱ्या पालिकेच्या निवडणूकीपूर्वी मनसेने पदाची घोषणा केली आहे. यात मनसेच्या कार्यकारणीमध्ये नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मनसे आमदार राजू पाटील यांचे छोटे बंधू विनोद पाटील यांनीही राजकारणात एंट्री केली आहे. मनसेकडून त्यांना पदही देण्यात आले आहे. माजी आमदार रमेश पाटील, विद्यमान आमदार राजू पाटील यांच्यानंतर आता विनोद पाटीलही राजकारणात सक्रिय होत आहेत.

विनोद पाटील कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाहीत. पण अलीकडे त्यांच्या होर्डिंगवर फोटो झळकत असल्याने चर्चा रंगल्या होत्या. अखेर राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या कल्याण ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यात विनोद पाटील यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभेचे अध्यक्ष पद देण्यात आले. ग्रामीण भागातील तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून विनोद पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी मनसेकडून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघा साठी राजू पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आलं. मात्र आमदार पाटील हे आपल्या कामानिमित्त परदेशात होते. मात्र या निवडणुकीच्या कालखंडात अगदी काही वेळ असताना देखील विनोद पाटील यांनी ग्रामीण भागातील तरुणाई एकत्रित करून आमदार राजू पाटील यांना निवडून आणले होते.ग्रामीण भागात पक्षाची बांधणी नसतानाही आमदार राजू पाटील यांना निवडून आणण्यात विनोद पाटील यांचा मोठा वाटला होता. त्यांच्या या कामाची दखल घेत विनोद पाटील यांच्या खांद्यावर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT