MNS's Big Tweet today, Today's big tweet of MNS, MNS Latest News Updates
MNS's Big Tweet today, Today's big tweet of MNS, MNS Latest News Updates  sarkarnama
मुंबई

MNS : आज मोठ्ठा ‘आवाज’ होणार ; मनसेचं नव टि्वट

सरकारनामा ब्युरो

पुणे : मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा या विषयावर सध्या राज्याचे राजकारण तापलं आहे. दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मनसेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी ३ मेची मुदत महाविकास आघाडी सरकारला दिली आहे. राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. त्यामुळे मनसेकडून आज कोणती नवीन घोषणा होणार, कुणावर टीकास्त्र डागणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे. (Today's big tweet of MNS)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर ( Amey Khopkar)यांनी टि्वट करीत ही माहिती दिली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत मोठ्ठा ‘आवाज’ होणार आहे, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

मंगळवारी इस्लामपुरच्या सभेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde)यांनी मनसेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरेंना 'अर्धवटराव'असे म्हणत मुंडेंनी त्यांची खिल्ली उडवली आहे. त्याला मनसेचे नेते,महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर( Amey Khopkar) यांनी मुंडेंना बुधवारी प्रत्युत्तर दिलं आहे.

''अहो, धनंजय मुंडेराव,तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’म्हणून खिल्ली उडवताय,ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत.

राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार. लवकर बरे व्हा,धनंजय मुंडे,''असे टि्वट करीत मुंडेंना डिवचलं आहे. आता मुंडे यावर काय उत्तर देतात, याबाबत उत्सुकता आहे.

मुंडे यांनी राज ठाकरेंना रामदास पाध्ये (ramdas padhyes)यांच्या अर्धवटराव बाहुल्याची उपमा देत त्यांची खिल्ली उडवली आहे. इस्लामपुर येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवार संवाद कार्यक्रमात मुंडे बोलत होते. ठाण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या उत्तरसभेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, ''राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करीत आहेत. पण पूर्वी शाळेत असताना अर्धवट नावाचे पात्र असायचे.बाहूलाच्या तोंडून बोलायचे हे पात्र. अशा बाहुलच्या तोंडून हे बोलतात.या अर्धवट रावांच्या मागे ईडीचा परिणाम असा झाला की 'लाव रे ती सीडी' म्हणणारे आता सगळे विसरून गेले आहेत. माणस सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्ष्यात आपण पाहिले आहे,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT