Kalyan Political News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी कल्याण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्ते दुर्गाडी येथे थांबले होते. याचवेळी खासदार कपिल पाटील रस्त्यावरून जात होते. त्यांचा ताफा पाहून मनसे कार्यकर्त्यांना वाटले राजसाहेबच आले. त्यामुळे त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. एकीकडे फटाके फुटत होते त्याचवेळी समजले की तेथे ठाकरे नसून खासदार कपिल पाटील आले आहेत. यामुळे राज ठाकरेंची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. दरम्यान, साहेबांच्या स्वागतासाठी पुन्हा फटाके आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी धावपळ उडाली. या प्रकाराची कल्याणमध्ये चवीने चर्चा रंगली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात पाहणी दौरा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसांच्या कल्याण, भिवंडी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कल्याण-डोंबिवली शहरात जागोजागी फलक आणि पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये त्यांच्या कटआउट आणि पोस्टरची चर्चा शहरात रंगलेली आहे. असे असले तरी कार्यकर्तेही त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या निधनानंतर राज ठाकरे कल्याण दौरा करणार की नाही, अशी चर्चा होती. मात्र ते कल्याण दौऱ्यावर येणार असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली. ते ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या दुर्गाडी रस्त्यावर कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी येऊन थांबले होते. त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती.
दरम्यान, याच रस्त्यावरुन खासदार कपिल पाटील (Kapil Patil) जात होते. त्यांचा ताफा पाहून कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आले असे वाटले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पटाके वाजवले. फटाक्यांची आतशषबाजी संपल्यानंतर कार्यकर्त्यांना समजले की ते आपले लाडके नेते राज ठाकरे नसून कपिल पाटील आहेत.
यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. तसेच जल्लोषात स्वागत केले पण दुसऱ्याचेच हे लक्षात आल्याने त्यांचा हिरमोडही झाला. त्यानंतर पुन्हा आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी तयारी करण्यास कार्यकर्त्यांची मोठी धावाधाव झाली. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी गाडीवरुन मनसेचे झेंडे फडकवत बाईक रॅली केल्याचे पाहिला मिळाले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.