Raj Thackeray rally in Aurangabad
Raj Thackeray rally in Aurangabad Sarkarnama
मुंबई

MNS : असा आहे मनसेचा 'आर प्लान'; कार्यकर्ते सज्ज

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सध्या राज्यामध्ये मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत (Bhonge vs Hanuman Chalisa) वाद उफाळला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 एप्रिलपर्यंत मशिदींवर लावलेले भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतरही ज्या मशिदीवर भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवण्यात येणार ( Raj Thackeray rally in Aurangabad ) असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी त्याच्या सभेत दिला होता.

औरंगाबाद येथे मनसेची १ तारखेला सभा आहे. या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. मनसेचा 'आर प्लान' ( MNS's 'R plan') तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आता भोंगे खरेदी करण्यास सुरवात झाली आहे.

औरंगाबादसाठी मनसेकडून ५० हून अधिक भोंगे खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातून बॅटरीवर चालणाऱ्या 50 भोंग्यांची खरेदी मनसेने केली आहे. पहिल्या टप्प्यात मशिदीसमोरच्या मंदिरांवरच भोंगे वाजवण्याचा प्लान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भोंग्यांसाठी वीज, सीडी प्लेअर आदी लागत नाही. बॅटरीवरील भोंग्यांतच अॅम्प्लिफायर आहे. ते पेनड्राइव्ह वा ब्ल्यूटूथनेही कनेक्ट होतात. वजनाने हलके असल्याने सहज उचलून गच्चीवर ठेवता येतात. स्पीकरवरही हनुमान चालिसा वाजवण्याचे नियोजन आहे. मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवण्यासाठी मनसेनं हा प्लान तयार केला आहे. शहरातील मशिदींजवळील मंदिरांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे.

दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांच्या घरावर भोंगे लावले जाण्याचा मनसेचा प्लॅन असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. कार्यकर्ते, पदाधिकारी स्वखर्चातून त्यांना शक्य तेवढे भोंगे खरेदी करत आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. सर्व शहरांत स्थानिक पातळीवर भोंग्यांची खरेदी सुरू केली आहे.दुसऱ्या टप्प्यात मशिदीसमोर मंदिर नसणाऱ्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरावर भोंगे लावले जातील.

औरंगाबाद येथील सभेपूर्वीच मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरवात केली आहे. मुंबई, मराठवाडा येथील मनसेतील सुमारे ३५ नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT