Raj Thackeray ON EVM Controversy Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : लोकांनी केलेले मतदान कुठे झाले गायब ? विधानसभा निकालानंतर EVM वर राज ठाकरेंचे प्रथमच भाष्य

Raj Thackeray Speech Mumbai:विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सन्नाटा पसरला होता. एवढा सन्नाटा मी कधीच पाहिला नाही. त्यानंतर मी विचार करीत होतो. या निकालावर विश्वासच बसत नाही.

Mangesh Mahale

Mumbai,30 Jan 2025: विधानसभा निवडणुकीनंतर 'ईव्हीएम'मुळे महायुतीचं सरकार आले अशी टीका करण्यात आली. निकालानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच ईव्हीएम, महायुतीला मिळालेल्या जागा यावर भाष्य केले.

विधानसभेत निवडून आलेल्यांनाही या निकालावर विश्वास नाही, असे सांगत विधानसभेच्या मतदानावर जाऊ नका, लोकांनी मतदान केलं ते आपल्यापर्यंत आले नाही, ते मतदान गायब झाले, असे राज ठाकरे म्हणाले. ते मनसेच्या मेळाव्यात बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सन्नाटा पसरला होता. एवढा सन्नाटा मी कधीच पाहिला नाही. त्यानंतर मी विचार करीत होतो. या निकालावर विश्वासच बसत नाही. राजू पाटलांना त्यांच्या गावातील एकही मत पडले नाही, चौदाशे मतदान असलेल्या राजू पाटलांनी त्यांच्यागावातून एकही मत का पडले नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. .

मनसेचे नेते राजू पाटील यांचा पराभव झाला. त्यावर राज ठाकरे यांनी आकडेवारी मांडली. ते म्हणाले,"राजू पाटलाच्या गावात मतदारांची संख्या चौदाशे आहे. त्या चौदाशे मतांपैकी राजू पाटलांना किती मत पडले असतील. संपूर्ण गावातून त्यांना एकही मत पडले नाही, जी चौदाशे मतं आहेत ती दरवेळी राजू पाटलांना पाडायची त्या गावात एक मत नाही पडत असं म्हणत एक प्रकारे राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या बाबत संशय व्यक्त केला आहे.

दुसरं उदाहरण त्यांनी मराठवाड्यातील एका नगरसेवकांचे दिले. नगरसेवक झाले तेव्हा त्यांना 5500 मतदान त्याच्या भागात झाले होते, विधानसभा निवडणुकीला 2500 मतदान झालं, असे सांगत ठाकरेंनी ईएमव्हीवर संशय व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT