Eknath Shinde_Raju Patil 
मुंबई

Raju Patil: "केम छो उपमुख्यमंत्री! तिसरी भाषा म्हणून पर्याय देताय काय?"; राजू पाटलांनी एकनाथ शिदेंना काढला चिमटा

Raju Patil criticizes Eknath Shinde: पुण्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' असं म्हटल्यानं आता वाद सुरु झाला आहे.

Amit Ujagare

Raju Patil criticizes Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना 'जय गुजरात' असा उल्लेख केला. त्यांच्या या उल्लेखावरुन आता वाद सुरु झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कल्याणचे मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढला आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

पुण्यातील कोंढव्यात आयोजित गुजराती समाजाच्या मेळाव्यात अमित शहा मुख्य पाहुणे होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणंही केलं, भाषण संपल्यानंतर शेवटी त्यांनी "जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात" असे शब्द वापरले.

संजय राऊतांची टीका

केवळ व्यासपीठावर अमित शहा उपस्थित असल्यानं एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं आहे. यावरुन अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रुप आज बाहेर आलं! हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

राजू पाटील काय म्हणाले?

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या विधानानंतर कल्याणचे मनसेचे नेते राजू पाटील यांनी ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांचा जय गुजरात म्हणतानाचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला कॅप्शन देताना म्हटलं की, तिसरी भाषा हिंदी नाही म्हटलं म्हणून पर्याय देताय की काय? त्यानंतर केम छो उपमुख्यमंत्री असा हॅशटॅग वापरुन ही पोस्ट त्यांनी एकनाथ शिंदे यांना टॅग केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT