MNS leader Raju Patil reacts sharply to Gunaratna Sadavarte’s controversial remark about Raj Thackeray. sarkarnama
मुंबई

Gunaratna Sadavarte Vs Raju Patil : गुणरत्न सदावर्ते मनसेच्या रडारवर, राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख भोवणार!, राजू पाटलांचा सूचक इशारा

MNS Raju Patil Raj Thackeray : राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना सूचक इशारा मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

शर्मिला वाळुंज

Raju Patil News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत एकेरी भाषेत उल्लेख करत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती. राज ठाकरेंना थेट आव्हानाची भाषा करणरे सदावर्ते आता मनसे नेत्यांच्या रडावर आले आहेत.

“फिरताना जरा जपून फिरा. कोणीही येईल आणि तुमच्यावर हल्ला करेल आणि त्यानंतर तुम्ही आमच्या मनसेचं नाव घ्याल,” असे सूचक वक्तव्य करत माजी आमदार राजू पाटील यांनी सदावर्तेंना इशारा दिला आहे.

राजू पाटील म्हणाले, “कोण काय बोलतंय यापेक्षा त्यांची लायकी काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना जे पाहिजे ते आपण द्यायला नको. त्यामुळे अशा माणसाविषयी बोलायची आमची अजिबात इच्छा नाही.”

दरम्यान, डोंबिवलीत पार पडलेल्या ‘आन ठाकूर मान ठाकूर शौर्यगाथा’ कार्यक्रमावरूनही राजू पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. “डोंबिवलीतील आमदारांना आता आगरी समाजाची आठवण आली ही आनंदाची गोष्ट आहे. खरं तर ही त्यांची चौथी वेळ आहे. तिसऱ्या वेळेत त्यांनी स्मारक बांधलं, त्यासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मात्र अशाच प्रकारे प्रत्येक समाजाची दखल घेऊन काम केलं तर अधिक चांगलं राहील,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला आपणही जाणार होतो, मात्र कार्यक्रमस्थळी सर्वत्र भाजपचे कमळ चिन्ह दिसत असल्याने आपण जाणे टाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी कार्यक्रमाला जाणार होतो, पण तिथे सर्व कमळची चिन्हं लावलेली दिसली. त्यामुळे तो एका पक्षाचा कार्यक्रम वाटत होता आणि मी जाणं टाळलं,” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाण यांना टोला लगावला.

रविवारी संध्याकाळी डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात मनसेच्या ‘राजगड’ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास मनसे शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे, संदीप पाचंगे, धनंजय गुरव, राहूल कामत, अरुण जांभळे, योगेश पाटील, विनायक मुंडे, प्रणव केणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लवकरच शहराध्यक्षाची घोषणा

मनसे पदाधिकारी मनोज घरत यांनी मागील महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच परिसरात मनसेने नव्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करून पुन्हा संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी बोलताना राजू पाटील यांनी लवकरच डोंबिवली शहराध्यक्षपदाची घोषणा होणार असल्याचे संकेतही दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT