मुंबई : ''ओवेसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबड करू नये, ती औरंगजेबाची औलाद महाराष्ट्रात येऊन इथे बडबड करणार, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, कोणाच्या आशिर्वादाने हे सुरु आहे.'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे. (MNS's reply to Owaisi)
ही निजामाची औलाद इथे येऊन औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणार, यांना राज्य सरकारने वेसण घालावी आणि कारवाई करावी, अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे. तसेच, एका बाजूला राज ठाकरे यांच्यावर सोळा सोळा जाचक अटी टाकायच्या, जात, भाषा, प्रांत यांच्यावर बोलण्याची बंदी घालायची आणि हा ओवेसी येऊन इथे धर्मांध विधानं करणार नाहीतर महाराष्ट्रात जर धिंगाणा झाला आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर याला राज्य सरकार जबाबदार असेल. या धर्मांध ओवेसी बोकडांच्या दाढीचे केस कसे उपटायचे हे मनसे कार्यकर्त्यांना चांगलेच माहीत आहे. असेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.
एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी गुरुवारी (१२ मे) औरंगाबाद आले होते. यावेळी त्यांनी मशीदीवरील भोग्यांचा मुद्दा घेऊन औरंगाबादेत सभा घेतलेल्या राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ` ज्यांना घरातून हाकलून दिले आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार ? तेवढी त्यांची लायकी देखील नाही. (MNS) मुस्लिम समाज कोणाच्याही भुलथांपाना बळी पडणार नाही, आम्ही कुणाला घाबरणारे नाहीत, योग्यवेळी त्यांना उत्तर देण्यासाठी खंबीर आहोत, असा इशारा देखील अकबरुद्दीन ओवेसी यांनी यावेळी दिला.
याचवेळी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारला अल्टीमेट देणाऱ्या राज ठाकरेंचाही अकबरुद्दीन यांनी अप्रत्यक्ष समाचार घेतला. मी महाराष्ट्रात कुणाला उत्तर द्यायला आलेलो नाही, तेवढी त्यांची लायकी देखील नाही. ज्यांना घरातून हाकलून दिले त्यांच्याबद्दल काय बोलायचे ?
कुणी कितीही भडकावण्याचा प्रयत्न केला तरी मुस्लिम समाजाने त्याला बळी पडू नये. आम्ही योग्य वेळी अशा लोकांना उत्तर द्यायला खंबीर आहोत, असा इशाराही अकबरुद्दीन यांनी आपल्या भाषणात दिला. हा देश आमचा आहे, इथे सगळे सुखाने, गुण्यागोविंदाने राहू आणि देशाला पुढे नेऊ, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.