Aaditya Thackeray, Sandeep Deshpande News, MNS on Aaditya Thackeray, Sandeep Deshpande on Aaditya Thackeray sarkarnama
मुंबई

शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम ; मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

ईडीला हिशोब कसा द्यावा, यावर आदित्य ठाकरेंनी लक्ष द्यावं.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोण कुणाची 'बी', 'सी''टीम आहे, यावरुन चिखलफेक सुरु आहे. शिवसेनेचे (Shiv Sena)युवा नेते, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रविवारी मनसे ही भाजपची 'सी' टीम असल्याचे म्हटलं आहे. यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. मनसेनं शिवसेना, राष्ट्रवादीवर टीका केली आहे. (MNS on Aaditya Thackeray)

''काही पक्षांना मी टाइमपास पक्ष समजत होतो. आता तरी त्यांना थोडे काम मिळाले आहे, अशी मनसेचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. ‘एमआयएम’ही भाजपची ‘बी’टीम, तर मनसे ही ‘सी’टीम आहे, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली. ‘सकाळ माध्यम समुहा’च्या वतीने ‘लिडींग आयकॉन्स ऑफ महाराष्ट्र’या पुरस्कार वितरण कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्या या टीकेच्या समाचार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी घेतला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना देशपांडे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. “ शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे,'' असे संदीप देशपांडे म्हणाले.

“आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

संदीप देशपांडे म्हणाले, ''ज्या पद्धतीने विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रीय आहे, आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. काय केलं, कुठे कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब ईडी मागत आहे. त्यामुळे ईडीला हिशोब कसा द्यावा, यावर आदित्य ठाकरेंनी लक्ष द्यावं. आमच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. तुमच्यावर जी ईडीला हिशोब द्यायची वेळ आली आहे, ते नीट करा तेवढंच पुष्कळ झालं,”

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT