MNS Marathi Pathshala 
मुंबई

MNS Marathi Pathshala: ठाकरेंच्या डरकाळीनंतर अमराठी व्यापाऱ्यांची मराठी शिकण्यास सुरुवात; मनसेची 'मराठीची पाठशाळा' सुरु

MNS Marathichi Pathshala: राज्यात काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या वापरावरून सामाजिक व राजकीय वाद निर्माण झाले आहेत. विशेषतः मीरा रोड परिसरात याचे तीव्र पडसाद उमटले होते.

Amit Ujagare

MNS Marathi Pathshala: राज्यात काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेच्या वापरावरून सामाजिक व राजकीय वाद निर्माण झाले आहेत. विशेषतः मीरा रोड परिसरात याचे तीव्र पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एक सकारात्मक आणि विधायक उपक्रम हाती घेतला आहे. बोरिवली पश्चिम येथे अमराठी व्यापाऱ्यांसाठी ‘मराठीची पाठशाळा’ हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे या शाळेत येऊन मराठी शिकण्यासाठी अमराठी व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुंबईत व्यवसाय करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकवून त्यांचं स्थानिकांशी सुसंवाद अधिक सुलभ करणं हा आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात अनेक व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि मनसे कार्यकर्त्यांसोबत बसून मराठीची बाराखडी, मूलभूत शब्द आणि व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या वाक्यरचनांचं अध्ययन केलं. मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आला. एका व्यापाऱ्याने सांगितलं, "इथं व्यवसाय करताना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ही संधी मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला"

मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, "मराठी ही केवळ भाषा नाही, ती इथल्या मातीची ओळख आहे. जी लोकं इथे व्यवसाय करतात, त्यांनी स्थानिक भाषेचा आदर ठेवावा, हेच आमचं उद्दिष्ट आहे. आम्ही कोणावरही दबाव टाकत नाही, पण मराठी शिकण्याचा हा आग्रह निश्चितच पुढेही सुरू राहील."

याआधी मीरा रोडमध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत झालेला वाद चिघळला होता, त्यानंतर मनसेच्या या उपक्रमाने सौहार्दाचा मार्ग निवडला आहे. पुढील काळात मुंबईतील इतर भागांमध्येही 'मराठीची पाठशाळा' हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT