Narendra Modi, Amit Shah, Maharashtra-Karnataka border Latest News
Narendra Modi, Amit Shah, Maharashtra-Karnataka border Latest News Sarkarnama
मुंबई

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मोदी-शाह सोडवणार.. दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा वातावरणं तापलं आहे. यामुळे दोन्ही राज्याच्या सीमीवर्ती भागात कमालीचा तणाव वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. यामुळे सरकारकडून देखील या मुद्यावरून हालचालींना वेग आला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी आता खुद्द पंतप्रधान मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह लक्ष घालणार असल्याची माहिती शिंदे गटाचे खासदार धर्येशील माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या दोन्ही राज्यातील सीमावाद आता सुटणार का? याकडे दोन्ही राज्याचं लक्ष लागलं आहे. (Narendra Modi, Amit Shah, Maharashtra-Karnataka border Latest News)

खासदार धैर्यशील माने माध्यमांशी बोलताना म्हणाले, हा प्रश्न 800 गावांचा आहे, 2004 रोजी या बाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे.दिल्ली दरबारी या बाबात एक बैठक घेणार आहोत. उच्चस्तरीय कौन्सिल आहे. 2011 ला प्रकरण दाखल झाल असू मी तज्ञ समितीचा अध्यक्ष आहे. अॅड. हरीश साळवे यांना काढण्यात आलेलं नाही. ते आहेत या प्रकरणात वकील म्हणून काम करणारच आहेत. मात्र, ते लंडनमधून सध्या काम करत असल्याने दुसऱ्या वकिलांना यामध्ये जोडून घेत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत महाराष्ट्राचे नेते कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठक घेण्याची तयारी सुरू आहे. हरीश साळवे यांच्यासोबत आणखी एक टीम आणणार आहोत.खरंतर आता ही न्यायलीयन लढाई आहे, द्वेषाची लढाई करू नये, बंधुभाव कमी होऊ नये. 3 किंवा 6 तारखेला आम्ही सीमावर्ती भागाचा दौरा करणार आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले असून सीमाप्रश्न सोडवण्याचे आव्हान केलं आहे. तर संजय राऊत यांनी तर पंतप्रधान मोदी आणि शाह यांनाच हा प्रश्न सोडवण्याचे थेट आव्हान केले आहे. यामुळे शिंदे-फडणवीसांनी देखील या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातल्याचे दिसत आहे. याप्रकरणी खासदार माने यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोदी आणि शाह या प्रकरणी लक्ष घालतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT