Nawab Malik,Mohit Kamboj
Nawab Malik,Mohit Kamboj  sarkarnama
मुंबई

भंगार विक्रेत्या मलिकांवर शंभर कोटीचा दावा ठोकणार : मोहित कंम्बोज संतापले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईतील क्रुझवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत भाजपचे नेते मोहित कंम्बोज यांचा मेव्हणा ऋषभ सचदेवा याला एनसीबीनं ताब्यात घेतल होते. पण त्याला नंतर सोडून देण्यात आले. मुंबईतील भाजपच्या नेत्याने फोन केल्याने ऋषभ याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिल्याचा आरोप मलिक (Nawab Malik) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला होता. या पार्श्वभूमीवर मोहित कंम्बोज (Mohit Kamboj)यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मोहित कम्बोज म्हणाले की, मी नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही नाही. मी चैाकशीसाठी तयार आहे. माझ्यावर आरोप लावले की ncb च्या कारवाईत काही लोकांना वाचवण्यात माझा सहभाग आहे. पण माझ्याकडे पक्षाचं कोणतंही पद नाही आणि मी दीड वर्षापासून राजकारणापासून अप्लित आहे. ऋषभ सचदेवा माझा मेव्हणा आहे. त्याचा या प्रकरणाशी काय संबध आहे, याचे पुरावे नवाब मलिकांनी द्यावे, आर्यन खान सोबत त्याची कधीही भेट झाली नाही. आम्ही एनसीबीच्या चैाकशीसाठी तयार आहोत.

''नवाब मलिक खुर्चीचा गैरवापर करीत आहेत. ते कचऱ्याचा धंदा करतात, त्यांनी कचरा फेकून द्यावा. त्यांच्यावर खंडणीचा आरोप आहेत. त्यांच्यावर मी शंभर कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार आहे,'' असे मोहित कंम्बोज यांनी सांगितले. मोहित कंम्बोज हे भाजपाच्या मुंबई विभागाचे माजी महासचिव आहेत. त्यांच्याविरोधात एका प्रकरणामध्ये सीबीआय सुद्धा चौकशी करत आह

''या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. ज्यांनी आर्यन खानला बोलावले त्यांना का सोडण्यात आले, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. यातील ११ जणांची माहिती मुंबई पोलिसांनी देण्यात आली, त्यातील तीन जणांना सोडण्यात आले. त्यांना सोडण्यासाठी भाजपच्या कोणत्या नेत्याने एनसीबीला फोन केला याचा खुलासा करावा,'' अशी मागणी मलिकांनी पत्रकार परिषदेत केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT