mohit kamboj sarkarnama
मुंबई

Mohit Kamboj on Devendra Fadnavis : फडणवीसांनी वात पेटवली, दुसरीकडं मोहित कंबोज यांनी धूर काढला...

Rajanand More

Mumbai : लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपमधील नेते, पदाधिकाऱ्यांसाठीही हा धक्का सहन होत नाही. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटने चर्चेला तोंड फोडलं आहे.

मोहित कंबोज यांनी दुपारी 2.52 वाजता ट्विट करत "सिर्फ एक आदमी की लाइन छोटी करने के चक्कर में पार्टी का नुकसान किया!’ असे म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि मुंबई भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पराभवाची जबाबदारी कोण घेणार? वरिष्ठ नेते, मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करायला हवी," असे कंबोज यांनी म्हटले आहे.

कंबोज यांच्या या ट्विटनंतर त्यांचा हा रोख नेमका कुणाकडे, याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. ही पक्षातील अंतर्गत धुसफूस आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. पक्षातील एका व्यक्तीचे महत्व कमी करण्यासाठी पक्षाचे नुकसान केले, हे विधान त्यांनी नेमके कुणाल उद्देशून केले, हे नेते महाराष्ट्रातील की दिल्लीतील, वरिष्ठ नेते, मंत्री कोण, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे-पवार आणि काँग्रेसने 30 जागा खेचल्याने भाजप आणि मित्रपक्षांच्या नेतृत्वाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. भाजपला जेमतेम 9 जागा मिळाल्याने प्रदेश संघटनेत बदल होण्याचे संकेत दिले गेले.

काय म्हणाले आहेत फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच ( devendra Fadnavis ) आता सरकारमधून म्हणजे, उपमुख्यमंत्रीपदावरून मोकळे करण्याची अपेक्षा पक्ष नेतृत्वाकडे मांडली. गंभीर म्हणजे, जो काही पराभव झाला आहे. त्याची जबाबदारी माझी आहे. ती स्वीकारतो, अशी कबुलीही फडणवीसांनी दिली. मला पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारमधून मोकळे करावे, अशी विनंती पक्ष नेतृत्त्वाला करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT