Mohit Kamboj news, Maharashtra Political Crisis News, Devendra Fadnavis News
Mohit Kamboj news, Maharashtra Political Crisis News, Devendra Fadnavis News  
मुंबई

लौटकर जरुर आऊंगा! फडणवीसांचा फोटो ट्विट करत मोहित कंबोज यांचा सेनेला सूचक इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यातील सत्तासंंघर्षांचा आज सातवा दिवस आहे. बंडखोर शिवसेना आमदार गुवाहाटीत ठाण मांडून बसले आहेत. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) भविष्य पणाला लागले असताना दूसरीकडे भाजपच्या (BJP) गोटातील हालचालींनाही वेग आला आहे. असे असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत एक प्रकारे शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. (Mohit Kamboj news in Marathi)

मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीसांचा एक फोटोसोबत शायरी ट्विट करत म्हटले आहे की, ''मेरा पानी उतरतां देख किनारे पर घर मत बना लेना …. मै समंदर हु लौटकर जरूर आऊंगा …!!!'' त्यामुळे मोहित कंबोज यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष जबाबदारी दिली असल्याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे ज्या रात्री शिवसेना आमदारांनी मुंबई सोडली तेव्हापासून भाजपचे दोन नेते सावलीसारखे या आमदारांसोबत असल्याचे अनेक व्हिडीओजमधून दिसून आले. भाजप नेते संजय कुटे आणि दुसरे मोहित कंबोज अनेकदा बंडखोर आमदारांच्या सोबत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहेत. बंडखोर आमदार सुरत सोडताना सुरत विमानतळावर मोहित कंबोज तिथे उपस्थित होते. त्यानंतर आता गुवाहाटीमध्ये कंबोज तळ ठोकून असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या बंडखोरीच्या आधीपासूनच कंबोज यांनी याबाबत सर्व तयारी केली असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काल भाजपची बैठक झाली, तर आज दुपारी बंडखोर आमदार शिंदे गटाची बैठक होणार आहे. त्यानुसार बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उद्या (ता. २९ जून) मुंबईत (Mumbai) येणार आहेत. तसेच ते राज्यपालांना भेटून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तर भाजपच्या कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र ती अचानक रद्द करून फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची सरकार स्थापनेसाठी काही डील निश्चित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून 'मूव्ह ऑन' आदेश मिळताच महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल, अशीही शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT