Nana Patole , Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Nana Patole : 'ट्रिपल इंजिन' चं तीन तिघाडा सरकार फेल झालयं ; पीकविम्यावरुन पटोलेंचा सरकारवर घणाघात

Maharashtra Monsoon Session 2023 : सध्याच्या पीकयोजनेत सरकारनं बदल केले पाहिजे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Monsoon Session 2023 : "डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिनचं झालं आहे. या सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली असून हे तीन तिघाडा 'ट्रिपल इंजिन'चं सरकार फेल झालं आहे," अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला धारेवर धरलं.

रायगडमधील ईर्शाळवाडीवर दगड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला. पावसाळी अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले आहेत. विधिमंडळात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी नाना पटोले यांनी पीकविमा योजना, बोगस बियाणे, खत कंपन्या आदींवर सरकारवर टीका केली. "अतिवृष्टीमुळे होणारे भूस्खलन व त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी 2012 मध्ये गाडगीळ समितीने अहवाल केला होता. सरकारने आता त्या अहवालाकडे लक्ष दिले पाहिजे," असे नाना पटोले यांनी सांगितले.

"शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारला जनतेने येथे बसवले आहेत. पण हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत. सध्याच्या पीकयोजनेत सरकारनं बदल केले पाहिजे, दुबार पेरणीचा समावेश या पीक योजनेत करायला पाहिजे,"

कापसाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत पटोले यांनी व्यक्त केली. यावरुन नाना पटोले यांनी सभागृहात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला.

"गुलाबराव पाटील, तुमच्यासारखा वाघ माणूस सरकारमध्ये शांत कसा बसला आहे. कापसला योग्य भाव मिळत नाही. तुमच्या जिल्ह्यात (जळगाव) कापसाचे बोगस बियाणे निघाले आहे," "ज्या कंपन्यांना यापूर्वी सरकारने काळ्या यादीत टाकले होते. त्याच कंपन्या सध्या बियाणे, खतांची विक्री करीत आहेत. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे, सरकारने शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे," असे पटोले म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत विधानसभेत निवेदन दिले. "दुर्घटनेमुळे 22 ते 28 कुटुंब बाधित झाले आहेत. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर, 21 जण जखमी झाले आहेत. इर्शाळवाडीतील 70 जण सुखरूप आहेत. ते इतर कार्यक्रमांसाठी गावाबाहेर असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे," अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT