🔹 3-Point Summary:
आव्हाड-पडळकर वादामुळे खळबळ: जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात विधानभवनाच्या लॅबीमध्ये झालेल्या राड्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे.
आव्हाडांचा ठिय्या आंदोलन आणि रोहित पवारांची मागणी: आव्हाड यांनी विधानभवनासमोर ठिय्या दिला आणि रोहित पवारांनी गुंडगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
पडळकर यांचे उत्तर व राजकीय आरोप-प्रत्यारोप: पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी रोहित पवारांनी सरकारवर आणि फडणवीसांवर गंभीर आरोप करत "आका संस्कृतीवर" टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात विधानभवनाच्या लॅाबीमध्ये झालेल्या राड्यानंतर राज्याचे राजकारण पेटलं आहे. पडळकर-आव्हाड यांचे समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर गुरुवारी रात्री आव्हाड यांनी विधानभवनासमोर ठिय्या मांडला होता. पोलिसांच्या गाडीखाली शिरुर आव्हाडांनी आंदोलन केले.
यावर घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे भडकले असून त्यांनी विधानभवन परिसरात घडलेल्या घटनेत सहभागी झालेल्या गुंडांवर कारवाई करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हातात फलक घेऊन त्यांनी आज विधिमंडळ परिसरात आंदोलन केले.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार विधीमंडळात येत असतात, याच ठिकाणी कायदा बनवला जातो. पण सत्ताधारांना वाटतं आपण कुठलाही कायद्या हातात घेऊ शकतो, दमदाटी करु शकतो. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोक्काचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींना घेऊन विधानभवनात आणले गेले. विधीमंडळाच्या पायऱ्यावर त्यांना थांबवण्यात आले. आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोबाईवरुन शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली होती. अशी धमकी अधिवेशन सुरु असताना देण्यात आली.
आव्हाडांनी याबाबत अध्यक्षांना सांगूनही ज्यांनी धमकी दिली त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ज्यांनी आव्हाड यांना मेसेज पाठलेल्या व्यक्ती हा गांजा विकतो, गांजा विकणारे, मोक्का लागलेल्या व्यक्तींना घेऊन सत्ताधारी आमदार येथे येतो, आव्हाड यांना मारण्याचा प्रयत्न होतो. त्यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. सरकार यांच्यावर कारवाई कधी करणार? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
यापूर्वी बीडमध्ये एक आका होता, आता सांगलीत एक आका तयार झाला आहे. विधिमंडळ हे आपलं साम्राज्य आहे, असे त्याला वाटते. अशा आकांना वेळीच आवरा, असे रोहित पवारांना सरकारला सांगितले. आताच या आकांवर नियंत्रण केले नाही, तर उद्या यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जाईल, असे रोहित पवार म्हणाले. भाजपचे मोठे नेते अशा व्यक्तींचा वापर करतात, फडणवीसाचा खास माणूस म्हणून शरद पवार साहेबांवर बोललं जाते, जर फडणवीस मोठ्या मनाचे असतील, तर त्यांनी अशा व्यक्तींचे कान धरले असते, त्याला मोठ्या व्यक्तीबाबत खालच्या पातळीवर बोलू नको, अशी समज दिली असती, पण असे कुठेही दिसत नाही, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली.
मी अध्यक्ष महोदयांजवळ जाऊन दिलगिरी व्यक्त केली असून अध्यक्षांनी त्याच्यावर कारवाई करावी, अशी विनंती त्यांना केली आहे. माझ्या सहकाऱ्यांजवळून चूक झाली आहे. त्याच्यावर कारवाई करण्याता अधिकार अध्यक्षांचा आहे, असे पडळकर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
❓ 4 FAQs (with 1-line answers):
पडळकर-आव्हाड वाद कोणत्या ठिकाणी घडला?
→ विधानभवनाच्या लॅाबीमध्ये हा वाद घडला.
आव्हाड यांनी कुठे आंदोलन केले?
→ त्यांनी विधानभवनासमोर ठिय्या आंदोलन केले.
रोहित पवारांची काय मागणी होती?
→ गुंडांवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केली.
गोपीचंद पडळकरांनी काय प्रतिक्रिया दिली?
→ त्यांनी अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली आणि कारवाई करण्याची विनंती केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.