monsoon session parliament
monsoon session parliament  sarkarnama
मुंबई

मोदी सरकारला या शब्दांचे वावडे ; खासदारांनो, तोंड सांभाळून बोला !

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : येत्या 18 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (monsoon session parliament) सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वी खासदारांसाठी असंसदीय शब्दांची (Unparliamentary Words) यादी संसदेच्या सचिवालयाने जाहीर केली आहे. या यादीतील शब्दांवर मोदी सरकारनं बंदी घातली आहे. हे शब्द वापरल्यास ते असंसदीय समजले जाणार आहेत. (monsoon session parliament latest news)

असंसदीय शब्द 2021 या शीर्षकासह सचिवालयाने ही यादी प्रकाशित केली आहे. त्यामुळे खासदारांना आता संसदेत बोलताना स्वत:वर ताबा ठेवावा, लागणार आहे.

येत्या अधिवेशनापासून शब्दांच्या बाबतीत हा नियम लागू असणार आहे. "यातील काही शब्द असे असतात की ते तोपर्यंत असंसदीय वाटत नाहीत. जोपर्यंत ते संसदेत संबोधीत केलेल्या इतर संबोधनाशी ताडून पाहिले जात नाहीत," असे सचिवालयाने म्हटले आहे.

सचिवालयाकडून असंसदीय ठरवलेले शब्द आणि भावना सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकायच्या की कायम ठेवायचे याचे अंतिम राज्यसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष यांच्याकडे कायम असतील, असे संसदेनं प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत नमूद केलं आहे.

यानुसार हे शब्द असंसदीय (Unparliamentary Words) असणार आहेत.सत्ताधारी अथवा विरोधकांपैकी एखाद्या सदस्याने हे शब्द वापरले तर ते संसदेच्या पटलावरुन काढून टाकले जाणार आहेत. कोरोना स्प्रेडर (Corona spreader) हुकुमशाह, हुकुमशाही, जयचंद (Jaichand), विनाश पुरुष, जुमलाजीवी (Jumlajeevi) यांसारख्या इतरही काही शब्दांचा वापर संसदेमध्ये करणे असंसदीय ठरणार आहेत.

सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत असंसदीय मानलेले शब्द

हिंदी : खालिस्तानी, खून से खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, शकुनि, तानाशाह, तानाशाही, जयचंद, विनाश पुरुष, बहरी सरकार, उनमें, गद्दार, गिरगिट, घडियाली आंसू, अपमान, असत्य, अहंकार, करप्ट, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागिरी, बेचारा, बॉबकट, लॉलीपॉप, विश्वासघात, संवदेनही, मूर्ख, पिट्टठू, सेक्सुअल हॉरसमेंट

इंग्रजी : Crocodile Tears, Disgrace, Donkey, Anarchist, Dictatorial, Ashamed, Abused, Betrayed, Corrupt, Drama, Hypocrisy, Incompetent, Bloodshed, Bloody, Betrayed, Ashamed, Abused, Cheated, Chamcha, Chamchagiri, Chelas, Childishness, Corrupt, Coward, Criminal, Drama, Eyewash, Fudge, Hooliganism, Hypocrisy, Incompetent, Mislead, Lie, Untrue.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT