shivraj singh chouhan, Prem Singh Patel
shivraj singh chouhan, Prem Singh Patel sarkarnama
मुंबई

MP News : मुख्यमंत्री म्हणाले, 'एकच पत्नी असावी' ; व्यासपीठावरील ४ पत्नी असलेल्या मंत्र्याच्या पोटात गोळा, पद जाणार..

सरकारनामा ब्युरो

Shivraj Singh Chouhan : लग्न आणि घटस्फोट याबाबत विविध कायद्यांमधल्या वेगवेगळया तरतुदींमुळे वाद निर्माण होत आहे. ते संपुष्टात आणण्याची गरज असल्याचं म्हणत काही महिन्यांपूर्वी दिल्ली हायकोर्टाने समान नागरी कायदा लागू करण्याची गरज व्यक्त केली होती.त्यामुळे देशात हा कायदा लागू करण्यासाठी मोदी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. (Uniform Civil Code news update)

मध्य प्रदेशात समान नागरी कायद्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवराज सरकार लवकरच हा कायदा लागू करण्याच्या विचारात आहे. यासाठी ते समितीही स्थापन करणार आहेत. मात्र सध्या त्यांची परिस्थिती 'कुंपनच शेत खातयं'अशी झाली आहे. विरोधकांनी या प्रकरणी शिवराज सरकारला धारेवर धरलं आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी समान नागरी कायद्या लागू करणार यावर ठाम असल्याचे सांगितले. "व्यक्तीला एकच पत्नी असावी,' असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. यूनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी एक समिती स्थापन करण्याचे चौहान यांनी ठरविले आहेत. याविषयावर बोलत असताना चौहान यांच्यासोबत व्यासपीठावर मंत्री प्रेमसिंह पटेलही होते.

आपल्या भाषणात शिवराज यांनी महिलांचे शोषण रोखण्यासाठी एक पत्नीत्वाचा मुद्दा मांडला."व्यक्तीला एकच पत्नी असावी,'असे चौहान म्हणताच पटेल यांच्याकडे उपस्थित सगळे जण पाहायला लागले. कारण पटेल यांना चार बायका आहेत. बडवानी विधानसभा मतदार संघातून प्रेमसिंह पटेल हे निवडून आले आहेत. हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या परिसरात आहे.

शिवराज चौहान यांच्या या विधानानंतर पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यांचे मंत्रीपद जाणार अशी चर्चा रंगली आहे. आगामी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवराज सिंह यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा उचलला, तर चार बायकांमुळे पटेलांचे मंत्रीपद जाऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. एकापेक्षा जास्त पत्नी असलेल्या नेत्यांचे मंत्री होण्याची स्वप्न अपूर्ण राहणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

4 बायका असलेले प्रेमसिंह पटेल कोण आहेत..

  • प्रेमसिंह पटेल बडवानी मतदार संघातून निवडून आले आहेत. ते शिवराज सरकारमध्ये मंत्रीही आहेत.

  • त्यांच्या पत्नींची नावे असमा, सिरवटी, कमली व कोकीळा अशी आहेत. पटेलांना 3 मुलेही आहेत.

  • 2018 च्या निवडणुकीत दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातही त्याचा उल्लेख आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT