Uddhav Thackeray Latest News
Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

ठाकरे गटाचा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर? रामदास कदमांशी बंद दाराआड केली चर्चा

अनुराधा धावडे

मुंबई : मागच्या आठवड्यात शिवसेना (Shivsena) नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली होती, रामदास कदम यांच्या मुंबईतील पालखी या निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता या दोघांची भेट झाली. यादरम्यान दोघांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.

तीन आठड्यांपूर्वी गजानन किर्तीकर शिंदे गटात जाण्याच्याचर्चा सुरु होत्या. पण एकदा गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. पण किर्तीकर यांचे पुत्र आणि शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर यांनी मात्र त्यांच्या शिंदे गटात सामील होण्याला विरोध केला. मुलाच्या विरोधाने गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलल्याचे बोलले जात होते. त्यातच आता कीर्तिकर यांनी रामदास कदम यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा किर्तीवर चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर खासदार गजानन किर्तीकर हेदेखील शिवसेना सोडून शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू होती. पण किर्तीकर यांचे पुत्र आणि शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर यांनी मात्र त्यांच्या शिंदे गटात सामील होण्याला विरोध केला. मुलाच्या विरोधाने गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलला. 'शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संकटाच्या वेळी त्यांना सोडणे म्हणजे माझ्यासारखा दुसरा मतलबी नाही.' अशी भावना अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केली.

शिंदे गटाकडून गजाजन किर्तीकर यांना केंद्रात मंत्रीपद तर त्यांच्या मुलाला विधान परिषदेवर संधी देण्याची ऑफर देण्यात आल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी अमोल किर्तीकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली. असे करुन उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी करण्याचे जणू स्पष्ट संकेतच दिले आहेत. त्यामुळे अमोल किर्तीकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर गजानन किर्तीकर यांनीदेखील आपला निर्णय बदलत उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT