Navneet Rana News : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांच्या विरोधात जात पडताळणी प्रकरणाबाबतचा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांनी मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयात दाखल गुन्ह्यातून दोषमुक्ती करण्यात यावी, यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने त्यांच्या दोष मुक्ततेचा अर्ज फेटाळला आहे.
खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातून आपली दोषमुक्तता करण्यात यावी, यासाठी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात याचिका करण्यात आली होती. मात्र ती फेटाळल्यानंतर राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
या अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर न्यायालयाने निर्णय देत दोष मुक्ततेचा अर्ज फेटाळला आहे. तसेच अजामीनपात्र वॉरंटही योग्य असल्याचं सांगत सत्र न्यायालयाने त्या वॉरंटला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांना धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.