prataprao jadhav
prataprao jadhav  sarkarnama
मुंबई

Prataprao Jadhav : शिंदे गटातील खासदारावर मोदींनी सोपवली मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्युरो

बुलडाणा :शिंदे गटातील बुलढाणा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव (Mp Prataprao Jadhav) यांनी शंभर खोके मातोश्री ओके म्हणत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर दोन दिवसापूर्वी गंभीर आरोप केला आहे.

त्याच्या या विधानामुळे जाधव हे सध्या चर्चेत आहेत. प्रतापराव जाधव यांनी थेट ठाकरे यांना टार्गेट करत '100 खोके मातोश्री ok' असं म्हणत राज्यात खळबळ माजवून दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रतापराव जाधव यांना आता भाजपकडून दसऱ्याला मोठं गिफ्ट देण्यात आल आहे. जाधव यांची माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या स्थायी समितीच्या बदलांमध्ये शिंदे गटाला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

याआधी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याकडे माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार होता. मात्र आता मोदी सरकारने शिंदे गटातील बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. केंद्रात भाजपसोबत आल्यानंतर शिंदे गटाला मोदी सरकार पहिलं गिफ्ट दिलं आहे.

आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना 50 खोके एकदम ओके, म्हणून हिणवलं जायचं. मात्र आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट मातोश्रीलाच "शंभर खोके एकदम ओके" तेही दर महिन्याला म्हणून आव्हान दिलंय. या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापतय का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT