Eknath Shinde, Prataprao Jadhav sarkarnama
मुंबई

ठाकरेंनी केलेली हकालपट्टी शिंदेंनी पुन्हा धुडकावली; खासदार जाधवांना अभय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांची शिवसेना (shivsena) जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने ही हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा त्यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

जाधव यांच्यासह एक जिल्हा प्रमुख, 2 उपजिल्हा प्रमुख, आणि 3 तालुका प्रमुखांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत जाधव यांनी हकालपट्टी करण्यात आली होती. आज जाधव यांची पुन्हा एकदा संपर्कप्रमुख पदी पुनर्नियुक्ती करत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले आहे. जाधव यांच्या बरोबरच सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेचे आमदार फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. त्यानंतर खासदार सुद्धा शिंदेंच्या गळाला लागले. बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांनी आधीच शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर जाधव हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती.

उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची हकालपट्टी करुन त्यांच्या जागेवर वसंतराव भोजने यांनी नियुक्ती केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी जाधव यांची पुन्हा नियुक्ती केल्यामुळे जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटांच्या ४० आमदारांची मुंबईमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत शिवसेनेचे 12 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. विशेष म्हणजे, त्यात जाधव यांचा समावेश होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची नवीन राष्ट्रीय कार्यकारीनी जाहीर केली आहे. शिवसेनेने हकालपट्टी केलेल्या अनेक नेत्यांची शिंदे यांनी पुनर्नियुक्ती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT