Manisha Kayande, Rahul Shewale sarkarnama
मुंबई

Rahul Shewale : राहुल शेवाळेंचा लेटरबाँम्ब : मनिषा कायंदेंकडून ब्लॅकमेलिंग ?

Rahul Shewale News : शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे.

सरकारनामा ब्युरो

Rahul Shewale News : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची एसआटीमार्फत (SIT) चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी विधान परिषदेत केली होती.

त्यानंतर आता शेवाळे (Rahul Shewale) यांनी कायंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेवाळे यांनी कायंदे यांच्याविरोधात एक तक्रार केली आहे. शेवाळेंनी आरोप केलेलं हे प्रकरण २०११ मधील आहे.

शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे.या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. मनिषा कायंदे यांच्याकडून एका माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचा आरोप शेवाळेंनी केला आहे.

एका गुंडाच्या मार्फेत कायंदे यांनी धमकी दिल्याचा आरोप शेवाळेंनी केला आहे. या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शेवाळे यांनी फडणवीसांकडे केली आहे.

मनिषा कायंदे यांनी माजी आमदाराकडे खंडणी मागितल्याचा आरोपही शेवाळे यांनी केला आहे. डी. के. रावमार्फत या धमक्या दिल्याचे शेवाळे यांनी म्हटलं आहे.एका ज्येष्ठ नेत्यासोबत २००७ मध्ये लग्न करुनही २०११ साली लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी फडणवीसांनालिहिलेल्या पत्रातून केला आहे.

घर, वडिलांचा दवाखाना आणि दुकानांचं फर्निचर कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याकडून करुन घेतल्याचा आरोप शेवाळेंनी पत्रात केला आहे. फडणवीसांना लिहिलेल्या पत्रानंतर कायंदेंची चौकशी होणार का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर शेवाळे यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी आदित्य ठाकरे यांनी रिया चक्रवर्तीला अनेक फोन केल्याचा आरोप राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी बुधवारी केला होता. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

मनीषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांची चौकशी करावी, अशी मागणी गुरुवारी केली होती. सभापती नीलम गोऱ्हे यांनी शेवाळेंच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

याप्रकरणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर हरकत घेतली. तसंच, सभापतींकडे विनंती करून राहुल शेवाळेंनी केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT