Rahul Shewale, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

ठाकरे झाले कठोर; बंडखोरांच्या शुभेच्छांच्या जाहिरातीही नाकारल्या!

माजी मुख्यमंत्री शिवसैना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढिवस आहे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (27जुलै) 62 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरात विविध वर्तमान पत्रात जाहिराती देण्यात आल्या आहेत. मात्र, एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'वर आरोप केले आहेत. सामनामध्ये आमच्या जाहिराती नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल शेवाळे म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन असते. मी सामनामध्येही जाहीरात दोतो. पण यावेळी आमच्या जाहीराती स्विकारल्या नाही. मात्र, आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत कायम आहेत. जाहिराती नाकारण्याचे कारण समजले नाही. शिंदे गटाचे सर्व खासदार त्यामध्ये होते.

शुभेच्छा माजी मुख्यमंत्र्यांना दिल्या की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्या, असा प्रश्न शेवाळे यांना विचारण्यात आला होता. त्यावर शेवाळे म्हणाले, मी दोघानांही शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या संसदेच्या इमारतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे तैल चित्र लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे, त्यांनी सांगितले. त्यांना यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, आज त्यांचा वाढदिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, त्यामुळे कुठलेही कडू वाक्य मी बोलू ईच्छित नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणे शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही टाळले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT