maratha reservation
maratha reservation sarkarnama
मुंबई

मराठा आरक्षणासाठी मुंबई डबेवाले सरसावले ; संभाजीराजेंचे उद्यापासून उपोषण

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) उद्या (ता. २६) खासदार संभाजीराजे (mp sambhaji chhatrapati)मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मुंबई डबेवाले सरसारले आहेत. 'मुंबई डबेवाला असोसिएशन' (Mumbai Dabewala Association)यांनी पाठिंब्याचे पत्र दिले.

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी उद्यापासून संभाजीराजेंनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. याला संपूर्ण महाराष्ट्रातून उस्पुर्त प्रतिसाद मिळत आहे. संभाजीराजे यांनी अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरला आहे.

त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं देखील केली. याशिवाय मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून त्यांनी सरकारपुढे ५ मागण्या ठेवल्या होत्या. मात्र त्या मागण्यांची अद्याप पुर्तता झालेली नाही.

''मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) २६ फेब्रुवारीला आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे,'' असे संभाजीराजेंनी नुकतेच पत्रकार परिषदेत जाहीर केले. याबाबत संभाजीराजेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्व आमदारांना पत्र लिहिलं आहे. ''लोकप्रतिनिधी या नात्याने आपण हे प्रश्न सरकारी पातळीवर सोडवू शकतो. गरीब मराठा समाजासाठी आपण यामध्ये नक्कीच पुढाकार घ्याल, ही अपेक्षा बाळगतो,'' असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यासह काही निवडक मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांच्यासोबत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील हजारो मराठा कुटुंब आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा सकल नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात संभाजीराजें म्हणतात..

● सरकार EWS मध्ये नियुक्ती देण्याचे सांगत असून ते अशक्य आहे. त्यामुळे ESBC, SEBC व EWS मध्ये वाद निर्माण होईल. हीच बाब महाधिवक्त्यांना सांगून थकलो आहे. त्यांनीच सांगावे की हा गोंधळ कशामुळे निर्माण झालेला आहे, आणि सरकार यावर कोणता ठोस मार्ग काढणार यावर स्पष्टीकरण देऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी.

●सारथी संस्थेला निधी मिळालेला नाही. शासनाने संस्थेला आगामी अर्थसंकल्पातून किती निधी देणार हे स्पष्ट करावे. सारथीचा कारभार नव्याने सुरू झाल्यानंतर नाशिक येथे वसतिगृह  इमारत प्रस्ताव, जागेचा प्रस्ताव, पुणे येथे पर्वती, एफ सी रोड येथील जलसंपदाविभागाची जागा यांचे प्रस्ताव शासनाकडे गेले असून त्याचा  हस्तांतर निर्णय झालेला नाही. 

● आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा २५ लाख रुपये करण्यात यावा, या मागणीवर सरकारने सकारात्मकता दाखवली होती. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी केलेली नाही. महामंडळास कायमस्वरुपी कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात यावी. तसेच, याबाबतीत मान्य केलेल्या सर्व मागण्या तातडीने अंमलात आणाव्यात.

● मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची मागणी केली होती.सोलापूर, नाशिक, पुणे याठिकाणी वसतिगृह सुरू करण्याचे प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित आहेत. शासनाने सर्व वस्तीगृहे तात्काळ शासकिय प्रक्रिया करुन हस्तांतरण करून उपयोगात आणावेत. शासन हा निर्णय लगेच घेऊ शकते.

● मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याची घोषणा सरकारनेच केली होती. मात्र कुणालाही नोकरी दिलेली नाही. याउलट काही वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याचे प्रस्तावित केले जात आहे, हे समाजाला मान्य नाही.

● राज्य सरकारला मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण व शिक्षण व नोकरीतील प्रतिनिधित्व न्यायालयीन निर्णयाप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुनर्विलोकन करावे लागणार आहे. त्यातून पुढील दिशा व कृती ठरविणे गरजेचे आहे. हे अद्यापि प्रगतीपथावर नसून त्यात अनेक प्रश्न तयार झालेले आहेत.

● मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक मागास सिद्ध करावे लागेल, तरच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT