Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Sarkarnama
मुंबई

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभा अपयशानंतर ठाकरेंच्या दोन शिलेदारांची खासदारकी धोक्यात?

MP Sanjay Raut & Priyanka Chaturvedi Will not get the Next Rajya Sabha Term: महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे 43 चा कोटा निर्धारित होतो. त्यानूसार महाविकास आघाडी मिळून एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल, असं समोर आलं आहे.

Mangesh Mahale

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने 236 जागा मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सलग तिसऱ्यांदा भाजपने महाराष्ट्रात आपल्या जागांची संख्या वाढवली आहे. पक्षफुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने लढवलेल्या या पहिल्याच निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. महाविकास आघाडीला फक्त 49 जागांवर समाधान मानाले लागले आहे. महाविकास आघाडीच्या या अपयशाचा फटका दोन खासदारांना बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांना पुढील राज्यसभा टर्म मिळणे कठीण झाल्याचे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनाही पुढील राज्यसभा टर्म देखील मिळणार नसल्याचे चित्र आहे, पण विधानसभा निवडणुकीत खुद्द पवारांनी पुढील काळात आपण सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाला मिळून 14 जागाच जिंकता आल्या. महाराष्ट्रातून राज्यसभेत जाण्यासाठी सामान्यपणे 43 चा कोटा निर्धारित होतो. त्यानूसार महाविकास आघाडी मिळून एक राज्यसभा सदस्य निवडून आणता येईल, असं समोर आलं आहे.

एकच खासदार निवडून देता येईल....

शरद पवारांच्या जागेवरही राष्ट्रवादीला राज्यसभेवर कुणाला पाठवता येणार नाही. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तीनही पक्षांना एकत्रित मिळून एकच खासदार निवडून देता येईल.

शिवसेना शिंदे गट 57, भाजप 132 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत.

सत्ता स्थापनेसाठी महायुतीनी तयारी सुरु केली आहे. आज महायुतीची महत्वाची बैठक आहेत. सरकार स्थापनेबाबत आज महायुतीकडून राज्यपालांना पत्र देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT