Sanjay Raut-Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॅानी लिव्हर यांची मिमिक्री पाहू" ; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Sanjay Raut : "राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे.

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (रविवारी) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची मिमिक्री केली होती . ते गोरेगाव येथे मनसेच्या गटअध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यांच्या मिमिक्रीवर ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

संजय राऊत सोमवारी माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची मिमिक्री केली, यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, "राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे. आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॅानी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांची मिमिक्री पाहू"

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या विधानावर सरकारने अद्याप कारवाई केली नाही, यावरुन राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं

एकनाथ शिंदेंनी रात्री फिरवलेल्या कांडीनंतर उद्धव ठाकरे हे राज्यभरात सगळीकडे फिरतायेत, पण भूमिका बदलणाऱ्यातला मी नाही, उद्धव ठाकरे हे स्वार्थासाठी कधी हे कधी ते असं करतात. उद्धव ठाकरेंवर किती केसेस आहेत, हे त्यांनी सांगाव, असं म्हणत राज ठाकरेंनी रविवारी सांयकाळी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

"सध्या या गटाला मान्यता मिळणार का? मग त्या गटाला मान्यता मिळणार का? अशी सर्व परिस्थिती राज्यात सुरू आहे.पण ते जाऊद्या, महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व पक्षापेक्षा जास्त यश हे मनसेच्या आंदोलनाला आले आहे. टोल नाक्याच्या आंदोलनामुळे जवळपास ६० ते ६५ टक्के टोलनाके बंद झाले. हे मनसेच्या आंदोलनाचे यश आहे," असं राज ठाकरेंनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT