Gulabrao Patil Vs Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: गुलाबरावांनी गद्दारी का केली? राऊतांनी सांगितलं कारण ; ED च्या भीतीने ते थरथरत होते...

MP Sanjay Raut targets Shivsena Minister Gulabrao Patil: गुलाबराव पाटील यांच्या खात्यामध्ये 40-50 कोटी रुपये कुठून तरी जमा झाले होते, त्याच्यामुळे ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते.

Mangesh Mahale

Mumbai News: तीन वर्षापूर्वी शिवसेना फुटली, पण त्याचे कवित्व अद्याप संपलेले नाही. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते शिवसेना फुटीवर अद्यापही तोंडसूख घेत आहेत. शिवसेनेचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यातील कलगीतुरा सर्वश्रृत आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी याचा दुसरा अंक सुरु झाला आहे.

उध्दव ठाकरे यांना सोडून गेलेल्यांना संजय राऊत गद्दार म्हणतात, यावर गुलाबरावांनी राऊतांना डिवचलं आहे. राऊत हे शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र तेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, असा दावा गुलाबराव पाटलांनी केला आहे. त्याला राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गुलाबरावांनी शिवसेना का सोडली, यांचे कारण राऊतांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या सगळ्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मी अनेक बैठका हजर होतो. पण प्रत्येकाची दुखणे आणि आजार वेगळा असल्याचे मला माहित होते, असे सांगताना राऊतांनी गुलाबराव पाटलांचे उदाहरण दिले.

गुलाबराव पाटील यांच्या खात्यामध्ये 40-50 कोटी रुपये कुठून तरी जमा झाले होते, त्याच्यामुळे ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते. त्यांच्या बँकेत ज्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे होते. हे आजार आहेत दुखणे आहेत किंवा कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा त्याला तुम्ही काय करणार , असे राऊत म्हणाले.

भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार यांचे पण सोडून गेले, आमचे शिवसेनेचे पण सोडून गेले. भय आणि भ्रष्टाचार निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, असा आरोप राऊतांनी केला.

गुलाबराव यांचे म्हणणे काय मनावर घेता, तो पळून गेलेला डरपोक माणूस आहे. शिवसेना नक्कीच हायजॅक केली. निष्ठावंत सैनिकांनी गद्दार गेले आता ही जी शिवसेना आहे, उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावंतांची ही शिवसेना आहे. शिवसेना ही ठाकरे त्यांच्या ताब्यात आहे ही लोक हायजॅक करणार होते, गद्दारांना शेवटी पळून जावं लागलं, भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे, अशा शब्दात राऊतांनी गुलाबराव पाटील आणि शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांचा समाचार घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT