CM Eknath Shinde Latest News, MP Sanjay Raut News
CM Eknath Shinde Latest News, MP Sanjay Raut News Sarkarnama
मुंबई

शिंदेंना 15 खासदार भेटले? राऊतांनी आकडा 'करेक्ट' केला...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेतील (Shiv Sena) खासदारही शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जवळपास पंधरा खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. दोन तृतीयांश खासदारांचा गट करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे समजते. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut Latest News)

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्यासाठी दोन खासदारांनी ठाकरेंना पत्र दिलं होतं. त्यानंतर झालेल्या बैठकीत अनेक खासदारांनी हीच भूमिका मांडली. त्यामुळे ठाकरेंना पाठिंबा द्यावा लागल्याची चर्चा आहे. या खासदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपशी युती करण्याचा आग्रहही केल्याचे समजते.

त्यानंतर आता जवळपास पंधरा खासदार शिंदे यांना भेटल्याचे समजते. पक्षांतरबंदीची कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश खासदार एकत्र येऊन शिंदे गटात जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. पंधरा खासदारांच्या या भेटीबाबत गुरूवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी विचारले त्यावेळी त्यांनी फिरकी घेतली.

पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी किती पंधरा खासदार, असं विचारत हा चुकीचा आकडा असल्याचे सांगितले. पंधरा नव्हे 115 खासदार असतील. कदाचित देशातील सगळे खासदार 280-285 भेटले असतील, अशा शब्दांत राऊतांनी हा प्रश्न टोलवून लावला. सोडून द्या, असं म्हणत ते पत्रकार परिषद संपवून निघून गेले.

मुर्मू मातोश्रीवर येणार का?

शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्या ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार का, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, त्या मातोश्रीवर याव्यात म्हणून शिवसेनेने पाठिंबा दिलेला नाही. हे राजकीय समर्थन नाही. या देशात पहिल्यांदाच एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. आदिवासी महिलेला हा बहुमान मिळत आहे. महाराष्ट्रातही आमचे अनेक आमदार, खासदार आदिवासी आहे. त्यांचीही ही इच्छा होती. म्हणून पक्षाने हा निर्णय घेतला. आज त्या मुंबईत येत आहेत. त्या मातोश्रीवर याव्यात म्हणून आम्ही पाठिंबा दिला नाही. आम्ही एनडीएमध्ये नाही तरीही आमचा पाठिंबा आहेत, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT