Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut म्हणाले, "अजितदादांच्या विधानाचा मी अभ्यास करतोय.."

Ajit Pawar : काही ठिकाणी आंदोलकांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला आहे.

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar : नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. (Sanjay Raut news update)

"छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे," अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली आहे.अजित पवार यांच्या भूमिकेनंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपने त्यांचा निषेध केला आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला आहे.

अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता राऊत म्हणाले, "अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर मी अभ्यास केल्यानंतर बोलणार आहे," राऊत सोमवारी पत्रकारांशी बोलत होते.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कसे वाद सुरू आहे, कशी घालमेल सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. मी वारंवार सांगतो आहे की हे सरकार टिकणार नाही, आणि हा गटही टिकणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर यांचे अंतिम ध्येय भाजपमध्ये विलीन होणे आहे," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले, "केसरकरांना वाटतंय शिंदे-ठाकरेंनी सोबत यावे, याचा अर्थ असा की त्यांनी आत्मपरिक्षण केले आहे. त्यामुळेच असे विधान बाहेर पडताय. शिंदे गटात टोळी युद्ध सुरू आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचे वक्तव्य म्हणजे वैफल्यग्रस्त असून त्यांच्यामध्ये अजून गट पडले असल्याचे दिसून येत आहे. तर 16 आमदार अपात्र ठरतील कारण आमची कायदेशीर बाजू अगदी सक्षम आहे,"

"उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे.आत्मपरीक्षण जर गद्दार करायला सांगत असतील तर कठीण आहे. या राज्याच्या जनतेने ठरवलेले आहे जे गद्दार आहे जे सोडून गेलेले आहेत, त्यांना परत विधानसभा किंवा लोकसभेत आणायचं नाही,"असे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT