Sanjay Raut
Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut यांची दिवाळीसुद्धा कारागृहात ; न्यायाधीशांनी पोलिसांचे कान उपटले !

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut : पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) सध्या आर्थंर रोड कारागृहात आहेत. काल (गुरुवारी) संजय राऊत यांच्या जामिनावरील अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. (Sanjay Raut latest news)

राऊतांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणीची सुनावणी आता २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. संजय राऊत यांची दिवाळी ही जेलमध्येच जाणार आहे.

यावेळी राऊतांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. संजय राऊत यांना ईडीने शुक्रवारी विशेष न्यायालयात (PMLA) न्यायालयात हजर केले होते.यावेळी न्यायालयाने पोलिसांना सुनावले. "बाहेर लोक राऊत यांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही," अशा शब्दात न्यायाधीशांनी पोलिसांचे कान उपटले आहे.

'तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हीच म्हणता की हे राजकीय केस नाही, मग ते लोकप्रतिनिधी आहेत किंवा आरोपी आहे जे बोलतात. याबाबत ईडीला काहीच अडचण नाही, असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना झापलं. यावर पोलिस म्हणाले, "सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो,"

पोलिसांनी दिलेल्या या उत्तराने न्यायाधीश संतापले. 'इथे काय गोळीबार होईल का? लेखी द्या, मग मी त्यावर निर्णय घेईल. मी बाहेर जाऊन सुरक्षा बघू शकत नाही. इतर आरोपींना चहा प्यायला नेतात, डबा खातात. जर ते राजकीय विधान करत असतील तर ईडीला काय अडचण आहे कारण ही राजकीय केस नाही, असे ईडीच म्हणत आहे. कोर्टाच्या बाहेरची गर्दी मी नियंत्रणात आणू शकत नाही. बाहेर लोक राऊत यांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. जर कोणी बंदुक, चाकू आणला तर गोष्ट वेगळी आहे' असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना खडेबोल सुनावले.

ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. हे प्रकरण अत्यंत क्लिष्ट असल्यानं आम्हाला याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे, असं कोर्टाने म्हटलं. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT