Nana Patole, Sanjay Raut
Nana Patole, Sanjay Raut sarkarnama
मुंबई

राऊतांच्या पत्रकार परिषदेवर पटोले म्हणाले, 'आरोपांचे समर्थन, पण..'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांची मंगळवारी पत्रकार परिषद झाली. त्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. कॉग्रेसने राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. पटोले म्हणाले, ''संजय राऊत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात खूप वास्तव समोर आले आहे. आम्ही दुधाने धुतलेलो आहोत, असा हेका लावणारी भाजपा आज त्यांच्या भ्रष्टाचारांमुळे संपूर्ण उघडी झाली आहे. यानिमित्त ईओडब्ल्यूच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने या सगळ्याची चौकशी करून, योग्य ती कारवाई केली पाहिजे,''

''राऊतांनी ईडी बाबत मोठा आक्षेप घेतला आहे. त्या आक्षेपात जर आपण पाहिलं की काही बिल्डर्सना ब्लॅकमेल करून, ईडी पैसा जमा करते आणि जवळपास ३०० कोटी रुपये यामध्ये त्यांनी जमा केलेले आहेत. हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जमा केले जातात की अमित शाह यांच्यासाठी जमा केले जातात? हा देखील महत्वाचा विषय आहे. की या पद्धतीच्या संस्था त्यांना केंद्रातील सरकारचं संरक्षण असल्यावरच अशा प्रकारची कारवाई करत असतील हे देखील नाकारता येत नाही,'' असे पटोले म्हणाले.

''संजय राऊत यांनी सांगितलं आहे की ते सर्व कागदपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आम्ही देणार आहोत, तर त्यांनी देखील तातडीने ही चौकशी केली पाहिजे,'' असे पटोले म्हणाले.

भाजप नेत्यांवर टीका करतांना ज्या शब्दाचा उपयोग केला गेला आहे, त्याचे समर्थन आम्ही करत नाही, असे पटोले यांनी सांगितले. ''आम्ही चुकीच्या भाषेच कधी समर्थन करीत नाही. मात्र भाजपचे आसाम येथील मुख्यमंत्री यांनी जी भाषा वापरली, त्याच भाजप मात्र समर्थन करीत आहे, मुंबईत भाजपने जो गोंधळ घातला ते मुंबईकरांना चांगलच ठाऊक असल्याचे नाना बोलले आहे। हिंसेच कांग्रेस कधीच समर्थन करीत नाही, मात्र मातृत्वावर जे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भाषा वापरली त्यांच काय.? असा सवाल ही पटोलेंनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT