Eknath Shinde and Sharad Pawar Received D Litt Degree
Eknath Shinde and Sharad Pawar Received D Litt Degree Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Meet CM Shinde: शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राऊतांचं मोठ विधान ; 'मुख्यमंत्र्यांचं सिंहासन..'

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut Reaction on Sharad Pawar - CM Shinde Meet : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले असताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राऊत म्हणाले, "शरद पवार हे मुख्यमंत्रीपदावर बसलेल्याला मान द्यायला गेले होते, व्यक्तीला नाही. त्यात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले, हलले असे काही नाही झाले. राष्ट्रीय स्तरावर महाविकास आघाडीचे शरद पवार हे प्रमुख नेते आहेत. राज्याच्या दुर्देवाने म्हणा किंवा अजून काही म्हणा मुख्यमंत्री पदावर एक व्यक्ती बसली आहे. त्यामुळे शरद पवार मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेले होते,"

"शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघेल का हे माहीत नाही, पण मुख्यमंत्र्यांचं सिंहासन लवकरच हलणार आहे," असे राऊत म्हणाले.

पवारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ही फक्त सदिच्छा भेट होती आणि मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती. या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही," वर्षा निवासस्थानाबाहेर आल्यानंतर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. (Latest Marathi News)

मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली, असं टि्वट शरद पवार यांनी केलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT