Sanjay raut Ekanath Shinde  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : जाहिरातकांडावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा बनाव ; मयुर शिंदेबाबत राऊतांचे ..

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणाची तपास सुरु आहे. सुनील राऊत यांनी धमकीचा बनाव रचला असल्याची चर्चा गुरुवारी होती.

मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. सुनील राऊत यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ व्हावी, यासाठी सुनील राऊत यांनी हा बनाव केल्याचे यात म्हटलं होते. त्यावर राऊतांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले. ते माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, "जर तो बनाव असता तर त्याने फोन नंबरवरून कळवलं नसतं. कारण फोन नंबरवरून माणसं ट्रेस होतात. हा त्यांचा बनाव आहे. संपूर्ण लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. जाहिरातकांडावरून लक्ष विचलीत करण्यासाठी हा प्रकार सुरु आहे,"

"जाहिरातकांडावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे बनाव मुर्ख लोकं रचतात. गेल्या वर्षभरात सातत्याने अशा प्रकारच्य घटना घडल्या आहेत. मध्यल्या काळात पुण्यातून व्यक्ती पकडली. ती व्यक्ती दानवेंसोबत होती. त्या व्यक्तीचा फोटो दानवेंसोबत होता म्हणून दानवेंनी बनवा रचला का?, असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

"या प्रकरणात अजून चार लोकांना पकडण्यात आलं. मयुर शिंदे यांचा माझ्यासोबत किंवा अन्य व्यक्तीसोबत फोटो असेल. परंतु ही व्यक्ती आता प्रसार माध्यमांतून समोर आली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीने भाजपात प्रवेश केला. मात्र, आता ते मिंधे गटात आहेत," असे राऊत यांनी म्हटलं आहे.

सुरक्षा व्यवस्था कधीही मागितली नाही

राऊत म्हणाले, "जे ७२ तास जाहिरातकांड चाललं. त्या जाहिरात कांडावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईत हा बनाव करण्यात आला. काही काळ लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व करण्यात आलंय. मी कधीही पोलिसांकडे सुरक्षा मागितली नाही. मी आमचं सरकार असताना सुद्धा पोलिसांकडे सुरक्षा व्यवस्था कधीही मागितली नाही,"

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT