Devendra Fadnavis, Sanjay Raut, Sanjay Raut on Devendra Fadnavis News sarkarnama
मुंबई

भाजपचा भगवा भेसळयुक्त ; शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्या, फडणवीसांना टोला

भाजप नकली रंग वापरत आहे. आम्ही राजकीय धुळवड कधीच खेळत नाहीत. महाराष्ट्रात सध्या रोजच धुळवड खेळली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गोव्यात (Goa Assembly Election) भाजपने मिळवलेल्या विजयानंतर प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे गुरुवारी नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. यावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राऊतांनी खोचक उत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut on Devendra Fadnavis News)

''फडणवीस आता गोवा जिंकून आले आहेत. मात्र गोवा काय आहे हे लवकरच भाजपला कळेल. गोवा पोर्तुगाल आणि इंग्रजांनाही कळला नव्हता, फडणवीस यांना देखील गोवा काय आहे ते कळेल, गोवा जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला असेल, पण त्यांनी प्रयत्न करावे, त्यांनी राजकीय कार्यात स्वतःला वाहून घ्यावे,' 'असे म्हणत राऊतांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे.

''भाजप भेसळयुक्त रंग वापरत आहे. भाजप नकली रंग वापरत आहे. आम्ही राजकीय धुळवड कधीच खेळत नाहीत. महाराष्ट्रात सध्या रोजच धुळवड खेळली जात आहे. पण वर्षातून एकदा अशा लोकांची धुळवड करायला हरकत नाही. होळी आणि शिमग्यात फरक आहे. भाजपनं शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्यावा. त्या पद्धतीनं रंग भाजपनं खेळावेत. महाराष्ट्राचा रंग स्वाभिमानाचा, ऐक्यतेचा, अखंडतेचा आहे हे त्यांनी समजून घ्यावं, असा सल्ला राऊतांनी फडणवीसांना दिला आहे.

राऊत म्हणाले, ''भाजप सरकार येणार नाही. ही भूमिका केवळ राष्ट्रवादीची नाही तर महाविकास आघाडीची आहे. काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाले आहेत. पुढचे अडीच वर्षही आम्ही सत्तेत राहणार आहोत आणि त्यानंतरचे पाच वर्षही आम्हीच सत्तेत राहू,''

''जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल केंद्रीय तपास यंत्रणा खोटे आरोप, चिखलफेक करून विकास आघाडीचे खासदार, आमदार, नेते यांचे मनोबल ते खाली आणण्याचा प्रयत्न करणार असतील तर ते चुकीचे आहे, असे राऊत म्हणाले.

''आम्ही शब्द राखून आणि मोजून-मापून बोलतो, सध्या न बोललेलं बरं, कारण राजकारण बिघडवून ठेवले आहे. समोरच्या विरोधकांनी, त्यांनी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा, राजकारणातला विनोद, आणि महाराष्ट्राचं संवेदनशील मन, हे सर्व नष्ट करून टाकला आहे, त्यामुळे सध्या लोक घाबरत आहेत बोलताना, या महाराष्ट्रात असं कधीच नव्हतं, हे दुर्दैवानं आमचा भाजपच्या मित्रांनी केलेले आहे,'' असा आरोप त्यांनी केला.

गुरुवारी भाजपच्या नागपूरमधील कार्यकर्त्यांकडून फडणवीसांचे स्वागत करण्यात येत आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, ''मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि जनतेच्या आशीर्वादामुळे यश मिळाले. यापुढच्या काळात मुंबई असो की नागपूर असो किंवा कोणत्याही महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका असो. तिथे भाजप एक नंबरला राहणार असून भाजपचाच झेंडा लागणार आहे.याशिवाय सरकार कधी पडेल या संदर्भातील चर्चा मला करायची नाही, कारण त्यावर पुन्हा वाद निर्माण होतात. पण २०२४ ला भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT