sanjay raut
sanjay raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : ईडी कारवायांवर राऊतांचे टि्वट, ओशोंच्या शब्दात फटकारलं..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासामध्ये 1039 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत ईडीने (ed) शिवसेनेचे (shiv sena) खासदार संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावले आहे. राऊतांनी (sanjay raut)पुन्हा आज टि्वट करीत ईडीला उत्तर दिले आहे. (Sanjay Raut latest news)

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राऊत हे सतत एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर टीकास्त्र सोडलं आहेत. यामुळे आता शिंदे गट विरुद्ध संजय राऊत असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

'मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है. जो डर गया वो मर गया,' असे टि्वट करत प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईला उत्तर दिले आहे. राज्यातील सत्तासंघर्ष आणि ईडीच्या कारवाईंबाबत राऊतांनी एक सूचक टि्वट केलं आहे. या टि्वटमध्ये राऊतांनी ओशो यांची एक ओळ ट्विट केली आहे.

राऊतांना ईडीनं बुधवारी (ता. 20) चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे 7 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राऊतांनी केली होती. ती फेटाळून लावत ईडीने त्यांना 27 जुलै रोजी हजर राहण्याचे नवे समन्स जारी केले.

पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहारातून अलिबाग येथे काही भूखंडांची खरेदी झाली असून, त्याची मालकी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे असल्याचा ईडीचा आरोप आहे. यापूर्वी ईडीने संजय राऊत यांची 1 जुलै रोजी 10 तास चौकशी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT