Sanjay Raut On Maratha Arakshan  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Maratha Arakshan : 'हिशोब जवळच आहे, सरकारची घटिका भरली... ; निमंत्रण नसल्याने राऊतांचा संताप !

Sanjay Raut On Maratha Arakshan : सरकारकडून या बैठकीसाठी ठाकरे गटाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Chetan Zadpe

Mumbai News : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित न केल्यामुळे आता ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

सर्वपक्षीय बैठकीला राज्यातला एक प्रमुख पक्ष शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रण दिले नसल्याची माहिती आहे. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर कठोर टीका केली होती. विरोधी पक्ष म्हणून अंबादास दानवे यांना निमंत्रित केले गेले आहे, पण सर्वपक्षीय बैठकीत पक्ष म्हणून ठाकरे गटाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. यामुळे सरकारकडून या बैठकीसाठी ठाकरे गटाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

याच मुद्द्यावर बोट ठेवत संजय राऊत म्हणाले, "या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्लज्ज राजकारण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांनादेखील बोलावले. पण शिवसेना यांच्या डोळ्यात खूपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटिका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे. जय महाराष्ट्र!" अशा शब्दांत राऊतांनी निशाणा साधला आहे.

सर्वपक्षीयांना निमंत्रण -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सर्वसहमतीने आरक्षणावर सकारात्मक विचार करून तोडगा काढण्याची भूमिका ठेवण्यात येणार आहे. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT