MP Udayanraje Bhosale has given the credit of Satara Medical College to Satarkars-ub73 
मुंबई

उदयनराजेंनी सातारच्या मेडिकल कॉलेजचे श्रेय दिले सातारकरांना....

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय, सातारा असे या महाविद्यालयाचे नांव असणार आहे. हे वैद्यकिय महाविद्यालय नाशिक येथील महाराष्ट्र हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीशी संलग्न असणार आहे.

उमेश बांबरे

सातारा : सातारच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेस राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे वैद्यकिय शिक्षण घेऊ इच्छिणा-यांसाठी 100 जागांची जादा संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांची आम्ही भेट घेतली होती. या वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व श्रेय प्रत्येक सातारकरांचे आहे. त्यामुळे सातारच्या विकासात आणि  उलाढालीत अमुलाग्र बदल होणार असून याचा सकारात्मक परिणाम सर्वच क्षेत्रात दिसेल, असा विश्वास भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. MP Udayanraje Bhosale has given the credit of Satara Medical College to Satarkars

यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले की, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर होण्यासाठी किमान 500 खाटांचे हॉस्पिटल आवश्यक होते. सदरची अट पूर्ण करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करुन घेतल्यावर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

त्यानंतर वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्‍न सोडवण्यात आला. खरेतर गतवर्षीच वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. मात्र अनेक टप्पे पार करण्याच्या क्लिस्ट प्रक्रियेमुळे आणि काही वेळा मुलभुत प्रश्‍न अधांतरी राहिल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया गतवर्षी होऊ शकली नाही. याची खंत वाटते. आता २०21-22 ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यास आम्ही तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि विद्यमान आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्यासह राज्याचे वैद्यकीय
शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.

हे महाविद्यालय सुरु होण्यासाठी अनेकांचा हातभार लागल्याने आज राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या वर्षीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मंजूरी दिली आहे. देर से आये, मगर दुरुस्त आये.. या उक्तीप्रमाणे विलंबाबत खंत वाटली. पण, आता समाधानही वाटत आहे, असे खासदार उदयनराजे यांनी नमुद केले
आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय, सातारा असे या महाविद्यालयाचे नांव असणार आहे. हे वैद्यकिय महाविद्यालय नाशिक येथील महाराष्ट्र हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीशी संलग्न असणार आहे.

12 सप्टेंबर 2021 रोजी नीट परिक्षा झालेली आहे. या परिक्षेच्या मेरिट लिस्ट नुसार राज्यातील सुमारे 24 शासकीय महाविद्यालयामध्ये प्रत्येकी 100
जागांप्रमाणे एकूण 2400 तसेच राज्यात खाजगी वैद्यकिय महाविद्यालये आणि डिम्ड युनिर्व्हसिटी यांच्याकडील सुमारे 1600 असे एकुण सुमारे 4000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित होणार आहेत. सातारचे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येत्या दीड महिन्यांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सुरु होईल. यामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याना प्रवेश घेण्याकरीता जादा जागांची संधी उपलब्ध झाली आहे.

देशातील पहिल्या सैनिक शाळेचा अभिमान बाळगणा-या सातारकरांच्या अभिमानामध्ये, या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयामुळे अधिक भर पडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व श्रेय प्रत्येक सातारकरांचे आहे. वैद्यकिय महाविद्यालय सुरु होण्याकरीता डीन डॉ.संजय गायकवाड, विद्यमान सिव्हिल सर्जन, वैद्यकिय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी- नियु्क्त कर्मचारी यांचे तसेच लोकप्रतिनिधींचे योगदान आहे, असेही त्यांनी नमुद केले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यावर सातारा शहराबरोबरच जिल्हयाच्या विकासाला चालना मिळेल. सर्व क्षेत्रात रोजगार, उलाढाल यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. शासकीय महाविद्यालय सुरु झाल्याने सातारा शहरात अमुलाग्र बदल घडेल. 

-उदयनराजे भोसले (खासदार, सातारा) 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT