MPSC Student_Satyagrah Protest Pune 
मुंबई

MPSCच्या सचिवांची अखेर बदली! मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं; विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश

MPSC News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार, एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे.

Amit Ujagare

MPSC News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार, एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. बदलीचा आदेश निघाला असून यानंतर आयोगाच्या अध्यक्षांच्या संमतीनंतर अन्य अधिकाऱ्यांकडं सचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात येणार आहे. एमपीएससीचं पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची न्यायालयीन चौकशी तसंच सचिवांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी 'सत्याग्रह' आंदोलन पुकारलं होतं.

आदेशात काय म्हटलं?

मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागानं या बदलीचे आदेश काढले असून कालच अर्थात १ ऑक्टोबर रोजी हे बदलीचे आदेश निघाले आहेत. या लेखी आदेशात म्हटलं की, महेंद्र हरपाळकर यांची दोन वर्षांसाठी एमपीएससीच्या सचिवपदी प्रतिनियुक्तीनं नियुक्ती करण्यात आली होती. पण आता प्रशासकीय कारणास्तव त्यांची सचिव या पदावरील प्रतिनियुक्ती या आदेशानंतर संपुष्टात येत आहे. त्यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील.

दरम्यान, प्रतिनियुक्ती रद्द झाल्यानंतर आता महेंद्र हरपाळकर यांनी आपला पदभार हा एमपीएससीच्या अध्यक्षांच्या संमतीनुसार, इतर अधिकाऱ्यांकडे तात्काळ सोपवावा, असंही या आदेशात म्हटलं आहे. यामुळं हरपाळकर यांच्यानंतर आता अध्यक्ष सचिवपदाची धुरा नव्या अधिकाऱ्याकडं सोपवतील.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

३० सप्टेंबर रोजी सत्याग्रह आंदोलनाची हाक दिलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांची बदली आणि अध्यक्षांची न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मंत्रालयात विद्यार्थी प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली होती. त्यामुळं पुण्यात २ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारं सत्याग्रह आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं. यापार्श्वभूमीवर आजच म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी सचिवांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यात मान्य झाल्यानं हजारो परिक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला होता. यानंतर हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. या दोन प्रमुख मागण्यांसह ७० हजार जागांची मेगा भरती आणि सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घ्याव्यात अशी मागणीही आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT