Ashwini Bidre and Abhay Kurundkar  Sarkarnama
मुंबई

मोठी घडामोड : अश्विनी बिद्रे हत्याकांडात कुरुंदकरचा पाय खोलात!

हत्या होण्यापूर्वी अश्विनी आणि कुरुंदकर हे दोघे एकत्र होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

पनवेल : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. हत्या होण्यापूर्वी अश्विनी आणि कुरुंदकर हे दोघे एकत्र होते, अशी माहिती एमटीएनएलच्या नोडल अधिकाऱ्याने न्यायालयात (Court) दिली आहे. यामुळे कुरुंदकरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात एमटीएनएलचे नोडल अधिकारी एस.धोतरे महत्वाचे साक्षीदार होते. त्यांची साक्ष विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मागील महिन्यात नोंदवली होती. मात्र, ते उलटतपासणीसाठी न्यायालयात हजर राहत नव्हते. यामुळे पनवेलच्या जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी आनंदर यांनी धोतरेंना दणका देत त्यांच्या विरोधात वॉरंट बजावले होते. वॉरंट बजावल्यानंतर अखेर ते न्यायालयात हजर झाले. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी घेतली.

आरोपीच्या वकिलांनी धोतरे यांची सुमारे साडेतीन तास उलटतपासणी घेतली. धोतरे यांनी दिलेले कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) बनावट असल्याचा दावा वकिलांनी केला. धोतरे मात्र, आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढला. त्यामुळे हत्या होण्यापूर्वी अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर एकत्र होते, यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हे आरोपी आहेत. साक्षीदारांच्या साक्षी त्यांच्या विरोधात जात असल्याने दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. या सुनावणीला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT