Sanjay Raut On Mukhyamanti Ladki Bahin Yojana Sarkarnama
मुंबई

Ladki Bahin Yojana : "आधी 1500 नंतर 500 अन् आता केवळ..."; लाडकी बहीण योजनेबाबत राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut On Mahayuti Government : महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र, राज्यात महायुती सत्तेत येताच या योजनेचे काही निकष बदलण्यात आले. शिवाय लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी देखील सुरू करण्यात आली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 15 Apr : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय यावेळी त्यांनी या योजनेबाबत मोठा दावा देखील केला आहे.

सरकराने बहिणींकडून पंधराशे रूपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली. त्या मतांची किंमत आता पाचशेवर आली असून काही दिवसांची त्याची किंमत शून्य होईल, असं राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती.

मात्र, राज्यात महायुती सत्तेत येताच या योजनेचे काही निकष बदलण्यात आले. शिवाय लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी देखील सुरू करण्यात आली आहे. शिवाय या योजनेअंतर्गत 1500 रूपये मिळणाऱ्या काही महिलांना आता केवळ 500 रूपये दिले जाणार आहेत. या योजनेतील बदलावरूनच राऊतांनी सरकारवर टीका केली.

राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनाचा हप्ता आता कमी मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या रक्कमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम आता या महिलांना दिली जाणार आहे. राज्यात एकूण आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 ऐवजी केवळ 500 रुपयेच मिळणार आहे.

याच मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत म्हणाले, "ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मते विकत घेतली, त्याची किंमत आता 500 रुपये झाली आहे आणि पुढे ती शून्य होईल. राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही आव आणला तरी, हे राज्य चालवणं आता आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नाही."

तर, मागील साडेतीन वर्षांमध्ये राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलं असून हे राज्य आता आर्थिक अराजकाच्या खाईमध्ये सापडलं आहे. यामुळे अजित पवार देखील चिंतेने ग्रासले आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केली.

अजित पवार आमच्या फाईली मंजूर करत नाहीत आणि आम्हाला निधी देत नाहीत, आम्हाला निधी देत नाही, म्हणजे नेमकं कुणाला? असा प्रश्न आम्हाला पडतो. तुमच्यासोबत जे किती 5-25 आमदार आहेत, ते सगळे गद्दार आहेत. ते फक्त पैसे आणि निधीसाठी तुमच्यासोबत आहेत. त्यांना फक्त राज्य लुटायचे आहे, आणि या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का? असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT