BJP-shivsena
BJP-shivsena sarkarnama
मुंबई

जाधवांच्या भाडोत्री गुंडांकडून धक्काबुकी, शिवीगाळ : भाजप नगरसेविकांचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात (Worli Gas Cylinder Blast) होरपळलेल्या चिमुकल्याचा नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा भाजपने आरोप केला आहे. याबाबत शुक्रवारी (ता.3 डिसेंबर) झालेल्या महापालिका सभागृहात सत्ताधाऱ्यांना जाब विचारला असता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेरील रस्त्यावर भाडोत्री गुंडांनी भाजपाच्या महिला नगरसेविकांना केलेली धक्काबुक्की, शिवीगाळ व विनयभंगाबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपच्या नगरसेविकांनी मुंबईचे सहआयुक्त, विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली आहे.

भाजप नगरसेविकांनी केलेल्या तक्ररीत म्हटले की, शुक्रवारी (ता.3 डिसेंबर) मुंबई महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष भायखळ्याचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी वादग्रस्त व बेताल विधाने केल्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. त्यांच्या क्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी भाजपाच्या महिला नगरसेविकांनी लावून धरली. याचाच राग मनात ठेवून जाधव यांनी बदला घेण्यासाठी कटकारस्थान करून सभागृहाबाहेर स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या शेकडो लोकांना बोलविले. रात्री 9.30 सुमारास सभागृहातून भाजपच्या नगरसेविका घरी जात असतांना सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर या भाडोत्री गुंडांनी व शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी धक्काबुक्की, शिवीगाळ केली, तसेच पुरूष गुंडांनी विनयभंगाचाही प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे.

याबाबतचे व्हिडीओ शुटींगही आणि सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध होऊ शकेल. ही बाब अत्यंत गंभीर असून या घटनेमुळे मुंबई शहरात महिला नगरसेविकासुध्दा सुरक्षित नाहीत हे सिध्द होते, असेही त्यांनी म्हटले. याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका रिटा मकवाना, राजेश्री शिरवडकर, समीता कांबळे, शीतल गंभीर, नेहल शाह, सारिका पवार, योगिता कोळी, जागृती पाटील, हेतल गाला, रेणू हंसराज, स्वप्ना म्हात्रे, आशा मराठे आदी नगरसेविका उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT