Mumbai BMC politics Sarkarnama
मुंबई

BMC Politics : दिल्लीने डोळे वटारताच मुंबईत शिवसेनेची गटनोंदणी रेंगाळली; ठाकरेंच्या शिलेदाराचा तिखट टोला!

Akhil Chitre Attacks Eknath Shinde Sena Over Delay in Group Registration of 29 BMC Corporators : मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांची गटनोंदणी रेंगाळल्यावरून शिवसेना ठाकरे सेना पक्षाकडून डिवचण्यात आलं आहे.

Pradeep Pendhare

Mumbai BMC politics : मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे शिवसेनेची गटनोंदणी रेंगाळल्याची माहिती समोर आली आहे. भाजपला सोडून स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय, यावर एकत्र येण्याचा आदेश, ठिकाणी बदलली, आदेश बदलले अन् अखेर गटनोंदणीचा निर्णय रद्द झाला.

शिंदेसेनेतील या नाट्यमय घडामोडीनंतर, नेमकं काय झालं, याची माहिती शिंदेसेनेकडून सांगण्यापूर्वीच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने निशाणा साधला आहे. पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी दिल्लीश्वराने डोळो वटारल्याने ही गटनोंदणी रेंगाळल्याचा टोला शिंदेसेनेला लगावला आहे.

भाजप-एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना मुंबई महापालिका युतीत लढली. एकनाथ शिंदे शिवसेनेला 29 जागांवर यश मिळालं. भाजप सत्तेजवळ आहे. परंतु बहुमताचा आकडा एकनाथ शिंदे शिवसेनेशिवाय पार करता येणार नाही. त्यामुळे सत्ता वाटपात शिवसेनेला महापौर मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपवर दबाव वाढवला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईवरील (Mumbai) मराठी माणसांची सत्ता गेल्याचा डाग पुसण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपवर राजकीय दबाव आणत, महापौरपदी पहिल्यांदा शिवसेनेला संधी मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेने भाजपबरोबर संयुक्त गटनोंदणीला पर्याय देत, स्वतंत्र गटनोंदणीचा निर्णय घेतला.

यानुसार आज गटनोंदणी होणार होती. परंतु ती आता रेंगाळल्याची माहिती समोर येत असल्याने राजकीय चर्चांना तोंड फुटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी यावर टायमिंग साधत, एकनाथ शिंदे शिवसेनेला डिवचलं आहे.

गटनोंदणीसाठी आदेश, ठिकाणी बदलली तरी.....

अखिल चित्रे म्हणाले, "एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक गटनोंदणीसाठी शिवतीर्थावर जमणार होते. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जमणार होते. पण हा कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर नवीन आदेश आला की, बाळासाहेब भवन (मुंबईतील एकनाथ शिंदे शिवसेनेचे कार्यालय) इथं जमायला सांगितलं. तिथला देखील कार्यक्रम रद्द झाला. पण पुढे गटनोंदणीचा कार्यक्रमच रद्द झाल्याचं समोर आलं."

शिंदेसेनेला दिल्लीतील भाजपच्या मालकांची भीती

'दिल्लीश्वरांसमोर मुजरा घालतात. त्या दिल्लेश्वरांनी डोळे वटारल्यानंतर गटनोंदणीचा कार्यक्रमच रद्द झाला. गटनोंदणीचा कार्यक्रम आज मुंबईला पाहाता आलाच नाही. पण गोंधळाचा काही कार्यक्रम झाला, तो मुंबईकरांना पाहाता आला. शिंदेसेनेचे काय वजन आहे, भाजपच्या नजरेत शिंदेंची काय किंमत आहे, हे आज स्पष्ट झालं आहे. भाजपच्या भीतीने अन् त्यांच्या दिल्लीतल्या मालकांच्या भीतीने शिंदेसेनेच्या नगरसेवकांची गटनोंदणीच झाली नाही,' असा टोला अखिल चित्रे यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT