BMC Election Sarkarnama
मुंबई

BMC Election update : ठाकरे ब्रँडच्या पराभवासाठी भाजपचे मातब्बर रिंगणात; पहिल्या यादीत सोमय्या, घोसाळकर, पुरोहित...

BJP first candidate list : काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाही तिकीट मिळाले आहे. त्यासोबतच अनेक माजी नगरसेवकांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे.

Rajanand More

Maharashtra municipal elections : मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकला चलोची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र आल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक असताना आता उमेदवारांची अधिकृत नावे समोर येऊ लागली आहे.

भाजपकडून मुंबईतील अनेक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले असून काहींनी आज उमेदवारी अर्जही दाखल करण्यास सुरूवात केली आहे. भाजपच्या ६६ जणांच्या पहिल्या यादीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या तेजस्वी घोसाळकर यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे भाजपमधील आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचाही पहिल्या यादीत भरणा असल्याचे समोर आले आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील, माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आकाश यांना उमेदवारी मिळाली आहे. पक्षाचे माध्यमप्रमुख नवनाथ बनही रिंगणात असणार आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाही तिकीट मिळाले आहे. त्यासोबतच अनेक माजी नगरसेवकांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे.

भाजपचे पहिल्या यादीतील उमेदवार (कंसात वॉर्ड क्रमांक) :

तेजस्वी घोसाळकर (२), गणेश खणकर (७), जितेंद्र पटेल (१०), राणी त्रिवेदी (१३), सीमा शिंदे (१४), जिग्ना शाह (१५), श्वेता कोरगावकर (१६), शिल्पा सांगोरे (१७), दक्षता कवठणकर (१९), बाळा तावडे (२०), शिवकुमार झा (२३), स्वाती जैस्वाल (२४), मनिषा यादव (३१), सिद्धार्थ शर्मा (३६), प्रतिभा शिंदे (३७), विनोद मिश्रा (४३), योगिता कोळी (४६), तेजिंदर सिंह तिवाना (४७), प्रीती साटम (५२), श्रीकला पिल्ले (५७), संदीप पटेल (५८), योगिता दाभाडकर (५९), सयाली कुलकर्णी (६०), रुपेश सावरकर (६३), रोहन राठोड (६८).

सुधा सिंह (६९), अनिश मकवानी (७०), ममता यादव (७२), उज्ज्वला मोडक (७४), प्रकाश मुसळे (७६), अंजली सामंत (८४), मिलिंद शिंदे (८५), महेश पारकर (८७), हेतल गाला (९७), जितेंद्र राऊत (९९), स्वप्ना म्हात्रे (१००), हेतल गाला मार्वेकर (१०३), प्रकाश गंगाधरे (१०४), अनिता वैती (१०५), प्रभाकर शिंदे (१०६), नील सोमय्या (१०७),  दिपिका घाग (१०८), सारिका पवार (१११), जागृती पाटील (११६),  चंदन शर्मा (१२२), अर्चना भालेराव (१२६), अलका भगत (१२७), अश्विनी मते (१२९), नवनाथ बन (१३५), बबलू पांचाळ (१४४), आशा मराठे (१५२), महादेव शिगवण (१५४), राजश्री शिरोडकर (१७२), साक्षी कनोजिया (१७४), रवी राजा (१८५), शितल गंभीर देसाई (१९०), राजेश कांगणे (१९५), सोनाली सावंत (१९६), रोहिदास लोखंडे (२०७), अजय पाटील (२१४), संतोष ढोले (२१५), स्नेहल तेंडुलकर (२१८),  सन्नी सानप (२१९), आकाश पुरोहित (२२१), मकरंद नार्वेकर (२२६),  हर्षिता नार्वेकर (२२७).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT